निक्की हेली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निक्की हेली
Nikki Haley
निक्की हेली

साउथ कॅरोलिनाची ११६वी राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
१२ जानेवारी २०११
मागील मार्क सॅनफर्ड

जन्म २० जानेवारी, १९७२ (1972-01-20) (वय: ४४)
ओक्लाहोमा सिटी, साउथ कॅरोलायना
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन
पती मायकल हेली
अपत्ये
शिक्षण क्लेम्सन विद्यापीठ
धर्म मेथडिस्ट (प्रोटेस्टंट)
शीख (लग्नापूर्वीचा)

निक्की हेली (इंग्लिश: Nikki Haley; जन्मनाव: निम्रता रांधवा, जन्म: २० जानेवारी १९७२ ही एक भारतीय वंशाची अमेरिकन राजकारणी व साउथ कॅरोलायना राज्याची विद्यमान राज्यपाल आहे. २०१० साली राज्यपालपदावर निवडून आलेली हेली २००५ ते २०११ दरम्यान साउथ कॅरोलायना प्रतिनिधींच्या सभागृहाची सदस्य होती. बॉबी जिंदाल नंतर राज्यपाल बनलेली ती दुसरीच भारतीय-अमेरिकन व्यक्ती आहे. २०१४ मधील पुनर्निवडणुकीत विजय मिळवून हेलीने सत्ता राखली. हेली साउथ कॅरोलायनाची पहिलीच महिला राज्यपाल असून ती आजच्या घडीला अमेरिकेमधील सर्वात तरूण (वय: ४४) राज्यपाल आहे.

२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूकीमध्ये हेलीने प्रथम मार्को रुबियो ह्याला तर नंतर टेड क्रुझ ह्याला आपला पाठिंबा जाहीर केला होता.

बाह्य दुवे[संपादन]