नंदिनी रमानी
नंदिनी रमानी | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | १८ नोव्हेंबर, १९५० |
जन्म स्थान | चेन्नई, तमिळनाडू, भारत |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
गौरव | |
पुरस्कार | संगीत नाटक अकादमी पुरस्कार |
नंदिनी रमानी (१८ नोव्हेंबर, १९५०: चेन्नई, तमिळनाडू, भारत ) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना, शिक्षिका, समीक्षक आणि संस्कृत नाटकांच्या दिग्दर्शक आहेत.[१] नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती रमानी यांना २०१२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[२]
ओळख
[संपादन]१८ नोव्हेंबर १९५० रोजी जन्मलेल्या श्रीमती नंदिनीने वयाच्या सहाव्या वर्षी भरतनाट्यम नृत्य शिकण्यास सुरुवात केली. गणेशन नट्टूवनार यांच्याकडून नृत्य शिकून आणि तिचे गुरू टी. बालसरस्वती कडून अभिनय (२५ वर्षांहून अधिक काळ).[३] तिच्या वडिलांचे नाव डॉ. व्ही. राघवन आणि भरतनाट्यम नृत्यांगना आणि शिक्षिका प्रियमवदा शंकर यांची धाकटी बहीण आहे.[४]
कारकीर्द
[संपादन]श्रीमती नंदिनी यानी १९७० मध्ये अरंगेत्रम भारत आणि परदेशात सादर केली. १९७३-७८ दरम्यान तिने मद्रास म्युझिक अकादमीद्वारे आयोजित भरतनाट्यमच्या बालासरस्वती स्कूलमध्ये शिकवले, जिथे तिने नृत्य प्रशिक्षण सुरू केले.[५]
पुरस्कार
[संपादन]त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तमिळनाडू राज्याच सर्वोच्च नागरिक कलईमामणि पुरस्कार त्यांना मिळाले आहे.[६] श्रीमती रमानी यांना नृत्यात दिलेल्या योगदानाबदल २०१२ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[७]
संदर्भ
[संपादन]- ^ "Nandini Ramani as the torchbearer of Bala bani". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 8 February 2018. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sangeet Natak Akademi fellowships (Akademi Ratna) and Akademi Awards (Akademi Puraskar) for the Year 2012 Announced". pib.gov.in (इंग्रजी भाषेत). 24 December 2012. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Carrying a legacy". डेक्कन हेराल्ड (इंग्रजी भाषेत). 23 July 2016. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Tradition and talent in balance". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 27 December 2019. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Bala, queen of abhinaya - Dhvani Ohio" (PDF). dhavaniohio.org (इंग्रजी भाषेत). 4 May 2023. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Tamil Nadu Kalaimamani awards – full list of winners". Indianexpress.com (इंग्रजी भाषेत). 15 August 2019. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Ilayaraja gets Sangeet Natak Akademi award". thehindubusinessline.com (इंग्रजी भाषेत). 12 March 2018. 4 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.