धीरेंद्रनाथ गांगुली (२६ मार्च १८९३ - १८ नोव्हेंबर १९७८), धीरेन गांगुली किंवा डीजी म्हणून ओळखले जाणारे, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि पद्मभूषण[१] प्राप्त करणारे चित्रपट उद्योजक/अभिनेता/दिग्दर्शक होते. ते प्रामुख्याने बंगाली चित्रपटसृष्टीत काम करत . त्यांनी अनेक चित्रपट निर्मिती कंपन्या स्थापन केल्या होत्या: इंडो ब्रिटिश फिल्म कंपनी, ब्रिटिश डोमिनियन फिल्म्स, लोटस फिल्म कंपनी. नंतर त्यांनी न्यू थिएटर्ससाठी चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांनी विनोदी शैलीतील अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा जन्म कलकत्ता येथे झाला आणि त्याच शहरात त्यांचे निधन झाले.[२][३]
^"Padma Awards"(PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 November 2014 रोजी मूळ पान(PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.