दौआला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दौआला
Douala
कामेरूनमधील शहर

Statue de la nouvelle liberte Douala.jpg

दौआला is located in कामेरून
दौआला
दौआला
दौआलाचे कामेरूनमधील स्थान

गुणक: 4°3′N 9°42′E / 4.050°N 9.700°E / 4.050; 9.700

देश कामेरून ध्वज कामेरून
राज्य मध्य प्रांत
क्षेत्रफळ ३८७ चौ. किमी (१४९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५२,४५,०२४
  - घनता १३,५३३ /चौ. किमी (३५,०५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००


दौआला हे आफ्रिका खंडामधील कामेरून देशामधील सर्वात मोठे शहर, सर्वात मोठे बंदर व कामेरूनची आर्थिक राजधानी आहे. कामेरूनच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले दौआला मध्य आफ्रिका भागातील सर्वात श्रीमंत शहर आहे.

इ.स. १४७२ साली पोर्तुगीज खलाशी येथे दाखल झाले. १८८४ मध्ये हे शहर जर्मनीच्या अधिपत्याखाली आले व कामेरूनश्टाड ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. १९०७ साली ह्याचे नाव बदलून दौआला ठेवण्यात आले. १९१९ साली पहिल्या महायुद्धानंतर दौआलावर फ्रेंचांनी ताबा मिळवला व फ्रेंच कामेरूनचा भाग बनला. १९४० ते १९४६ दरम्यान दौआला कामेरूनची राजधानी होती.

एफ.सी. बार्सेलोना ह्या फुटबॉल क्लबसाठी खेळणारा अलेक्झांडर सॉंग हा दौआलाचा निवासी आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: