Jump to content

देहू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देहु या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?देहु

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१८° ४३′ १२″ N, ७३° ४६′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर हवेली
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/
देहू येथील गाथा मंदिरात संत तुकाराम महाराज यांची मूर्ती

देहु हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.[] हे संत तुकारामांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. आषाढ महिन्यात देहू येथून पंढरपूर शहराकडे जाणारी संत तुकाराम यांची पालखी निघते.


महत्व

[संपादन]

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे.[] ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच नजिक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते अशी धारणा आहे.

धार्मिक महत्व

[संपादन]

देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर आदि स्थाने दर्शनीय आहेत. तुकारामबीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो.[]
इंद्रायणी काठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आलं आहे, संत तुकारामांचे अभंग संगमरवरी दगडा वर कोरवून मंदिराला आतून सजवण्यात आलं आहे.[]

देहू जवळ, इंद्रायणी काठी गाथा मंदिर

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

गावातील आणि गावाजवळील काही अंतरावर असणारी ठीकणे ... १- भंडारा डोंगर २- भामचंद्र डोंगर ३- घोरर्डेश्र्वर डोंगर ४- गाथामंदिर ५- प्राचीन शिवमंदिर ६- वैकुंठ गमन ७- माश्याचा डोह

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

चिखली

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sant Tukaram Maharaj Jayanti: देहू येथील संत तुकाराम महाराज गाथा मंदिराचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या..." TimesNowMarathi. 2024-02-13. 2024-06-27 रोजी पाहिले.
  2. ^ टीम, सकाळ ऑनलाईन (2022-06-14). "History Of Dehu: देहू गावाचा इतिहास". Marathi News Esakal. 2024-06-27 रोजी पाहिले.
  3. ^ author/online-lokmat (2024-03-26). "Tukaram Beej: तुकाराम बीजेला दुपारी १२ वाजता देहुतील नांदुरकी वृक्ष हलताना पाहण्यासाठी भाविकांची होते गर्दी!". Lokmat. 2024-06-27 रोजी पाहिले.
  4. ^ "तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज". eSakal - Marathi Newspaper. 2022-09-16 रोजी पाहिले.