देवाप्पा गुळाप्पा बडिगेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवाप्पा गुळाप्पा बडिगेर
पूर्ण नावदेवाप्पा गुळाप्पा बडिगेर
जन्म १९०२
मिसराकोटी, धारवाड जिल्हा, कर्नाटक, भारत (?)
मृत्यू सप्टेंबर ७, १९६७
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र रेखाटन, चित्रकला
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
वडील गुळाप्पा बडिगेर

देवाप्पा गुळाप्पा बडिगेर ऊर्फ डी.जी. बडिगेर (१९०२ - सप्टेंबर ७, १९६७) हे विसाव्या शतकातील कन्नड चित्रकार होते. विशेषकरून 'रेखाटन' प्रकारात त्यांची ख्याती होती.

जीवन[संपादन]

बडिगेरांचा जन्म १९०२ साली धारवाड जिल्ह्यातील 'मिसराकोटी' या गावी झाला. घरातील सुतारकामाच्या व्यवसायाचे वातावरण त्यांच्यातील उपजत कलागुणांच्या वाढीस बालपणापासून सहाय्यभूत ठरले. चित्रकलेतील पद्धतशीर शिक्षणाकरिता त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. 'जे.जे. स्कूल ऑफ आर्ट' मध्ये विद्यार्थी म्हणूनदेखील त्यांच्या प्रतिभेची चमक दिसून आली - १९२७ साली डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचे 'मेयो मेडल', राज्यपालांचे विशेष पारितोषिक इत्यादी पुरस्कार मिळाले.

चित्रकलेतील पुढील शिक्षणासाठी १९२९ साली बडिगेर लंडनमधील 'रॉयल ऍकॅडमी ऑफ आर्ट्स' येथे गेले. लंडनमधील मुक्कामात बडिगेरांचे एकल चित्रप्रदर्शनही भरले होते.

लंडनमधून १९३० साली [भारत|भारतात]] परतल्यावर काही काळातच बडिगेरांची 'इन्स्पेक्टर ऑफ ड्रॉइंग एॅंड क्राफ्ट्स' या जबाबदारीच्या सरकारी पदावर नेमणूक झाली. यापुढील काळात कलाशिक्षणाशी निगडित सरकारी जबाबदाऱ्या वाढल्यामुळे त्यांच्याकडून फार प्रमाणात चित्रनिर्मिती झाली नाही.

सप्टेंबर ७, १९६७ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

संदर्भ[संपादन]