दुखटण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धुकटण ऊर्फ दुखटण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.

  ?धुकटण ऊर्फ दुखटण

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
कोड
आरटीओ कोड

• महा ४८

भौगोलिक स्थान[संपादन]

पालघर रेल्वे स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर मासवण गावानंतर उजवीकडे जाणाऱ्या दहिसर फाट्यावर हे स्थित आहे. पालघरपासून हे गाव १४ किमी अंतरावर वसलेले आहे.

हवामान[संपादन]

येथे पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. उन्हाळ्यात दमटउष्ण हवामान असते तर हिवाळ्यात सुखद थंडी असते.

लोकजीवन[संपादन]

मुख्यतः कुणबी, आदिवासी समाजातील लोक येथे पिढ्यानपिढ्या स्थायिक आहेत. भातशेती, नागलीशेती बरोबरच रब्बी हंगामात फळभाज्या, फुलभाज्या, पालेभाज्या पिकविल्या जातात. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शाळा आहे.सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, रस्ते वीजपुरवठा, पाणीपुरवठा,इत्यादीची ग्रामपंचायतीमार्फत देखभाल केली जाते.महसूल काम, न्यायालयीन कामासाठी पालघर ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते.

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc