Jump to content

दिव्या अय्यर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिव्या अय्यर
दिव्या अय्यर (२०२१)
जन्म दिव्या अय्यर
१६ ऑक्टोबर १९८४
तिरुवअनंतपुरम
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण वैद्यकीय पदवी
पेशा
जोडीदार के. एस.सबरीनादन
अपत्ये

दिव्या शेषा अय्यर (१६ ऑक्टोबर. १९८४ - ) या एक भारतीय सरकारी नोकर, वैद्यकीय डॉक्टर, संपादिका आणि लेखिका आहेत. त्या केरळमधील भारतीय प्रशासकीय सेवेचा भाग आहेत.[१] दिव्या सध्या पथनामथिट्टाच्या जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. तसेच त्या मनरेगा मिशनच्या संचालिका देखील होत्या.[२][३]

जीवन[संपादन]

अय्यर यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९८४ रोजी झाला. त्या तिरुवनंतपुरमच्या आहेत.[४] त्यांचे वडील शेषा अय्यर हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, आणि आई भगवती अम्मल, स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या कर्मचारी आहेत.[५]

अय्यर यांचे शालेय शिक्षण होली एंजेल कॉन्व्हेंट त्रिवेंद्रम येथे झाले. केरळ सार्वजनिक परीक्षा, मंडळाने घेतलेल्या SSLC परीक्षेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.[६] अय्यर यांनी वैद्यकीय पदवी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरमधून मिळवली.[७]

कारकीर्द[संपादन]

ब्रेक द चेन मोहीम

प्रशासकीय सेवेत कारकीर्द सुरू करण्यापूर्वी अय्यर एक डॉक्टर होत्या. २०१४ मध्ये IAS मध्ये त्या दाखल झाल्या. त्रिवेंद्रमच्या उपजिल्हाधिकारी होण्यापूर्वी कोट्टायम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले.[८]

२०१६ मध्ये, निवडणूक आयोगाच्या अंतर्गत सिस्टिमॅटिक व्होटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (SVEEP)च्या नोडल अधिकारी आणि कोट्टायम येथील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून, अय्यर यांनी "माय व्होट माय फ्युचर" या ब्रीदवाक्यासह मतदार जागरुकता मोहीम तयार केली ज्यामुळे मतदानाची टक्केवारी सुधारण्यात मदत होईल.[९] २०१६ मध्ये, त्यांनी मतदान हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी 'व्हायरल थंबिल नमुदे भवी' हे गाणे लिहिले आणि गायले, जे त्यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केले होते.[१०]

२०१८ मध्ये, अय्यर यांची स्थानिक स्वराज्य विभागातील उपसचिवपदी बदली करण्यात आली.[११]

एका कार्यक्रमात भाषण देताना

संदर्भ[संपादन]

 1. ^ "केरल में कांग्रेसी विधायक सबरीनाथन और IAS अधिकारी दिव्या एस अय्यर रचायेंगे शादी! | अन्‍य राज्‍य News in Hindi". zeenews.india.com. 2022-03-02 रोजी पाहिले.
 2. ^ "Divya S Iyer IAS to Adeela Abdulla IAS, here are Kerala's 8 women District Collectors". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2021-07-10. 2022-03-02 रोजी पाहिले.
 3. ^ "Kerala MLA Sabarinathan ties knot with IAS officer Divya Iyer". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-06-30. 2022-03-02 रोजी पाहिले.
 4. ^ "Sabarinadhan weds Divya S. Iyer" (इंग्रजी भाषेत). Special Correspondent. Thiruvananthapuram. 2017-07-01. ISSN 0971-751X.CS1 maint: others (link)
 5. ^ "MLA KS Sabarinathan to marry Thiruvananthapuram sub-collector Divya S Iyer". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2017-05-03. 2022-03-02 रोजी पाहिले.
 6. ^ "മിടുക്കിയായി പഠിച്ച് ഐഎഎസ് നേടണം; പഠിക്കും, ഡോക്ടറാകും, ഐഎഎസ്സും". www.manoramaonline.com. 2022-03-02 रोजी पाहिले.
 7. ^ N, Aswin V. (2017-03-26). "'Imperfections need to be appreciated'" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
 8. ^ Reporter, Staff (2017-03-06). "This bureaucrat also heals" (इंग्रजी भाषेत). Thiruvananthapuram. ISSN 0971-751X.
 9. ^ "Straight bat: Vote bank message to lure voters". www.deccanchronicle.com. 2022-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-02 रोजी पाहिले.
 10. ^ "Kerala Assembly Election 2016: Kottayam Assistant Collector Divya S Iyer writes and sings for Sveep song | പാട്ടു പാടി 'വോട്ടു' ചെയ്യിക്കാന്‍ കോട്ടയത്തൊരു കളക്ടര്‍...ദിവ്യ എസ് അയ്യര്‍ - Malayalam Oneindia". malayalam.oneindia.com (मल्याळम भाषेत). 2016-04-13. 2022-03-02 रोजी पाहिले.
 11. ^ "Sub-Collector Divya S Iyer transferred to Local Self Government Department Department". The New Indian Express. 2022-03-02 रोजी पाहिले.