उटणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

उटणे हा अगरू, चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेला एक लेप आहे. हा अंगास लावून मर्दन केल्याने शरीर/चेहरा स्वच्छ होतो. कांती उजळते. अंगास सुगंध येतो. जुन्या काळात सहजगत्या उपलब्ध असणारे कस्तुरी आणि केशर हे पदार्थ सध्या सहज उपलब्ध नाहीत. उपलब्ध झाल्यास ते बरेच महाग आहेत.

त्यास पर्याय म्हणून आजकाल कापूरकाचऱ्या, बावची, गुलाबाच्या सावलीत वाळवलेल्या पाकळ्यांची पावडर, वाळ्याच्या मुळ्यांची पावडर, हळद पावडर, अर्जुन वृक्षाच्या वाळून गळून पडलेल्या सालीची पावडर इत्यादी सुगंधी व औषधी वनस्पती वापरून उटणे तयार करतात. यास दुधात घट्ट भिजवून त्यात थोडे तिळाचे तेल टाकून मग अंगास लावतात. हा लेप मग वाळण्यापूर्वी रगडून काढतात. चेहर्‍यास लावलेला लेप रगडून न काढता हलके हाताने काढतात.

हळद असलेले उटणे लग्नापूर्वी वधूच्या अंगाला लावतात. दिवाळीतल्या उटण्यात हळद नसते.

पूर्वी उटणे घरीच तयार करीत असत. आजकाल ही पद्धत मागे पडली आहे. दिवाळीच्या वेळेस बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत मिळतात. ही उटणी पाण्यात भिजवून नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नापूर्वी अंगाला लावतात.

'


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हेही पहा[संपादन]