दादासाहेब रुपवते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दादासाहेब रुपवते

जन्म 28 फेब्रुवारी 1925
मृत्यू 23 जुलै 1999

दामोदर तात्याबा रुपवते (28 फेब्रुवारी 1925 - 23 जुलै 1999), सामान्यतः दादासाहेब रुपवते म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय राजकारणी, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्राचे संपादक होते.[१] सुरुवातीला ते शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते आणि नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले.[१] दादासाहेब रुपवते हे मानवाधिकार नेते बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी होते.[१][२]

ते 3 ऑक्टोबर 1957 रोजी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक-सदस्य होते. 1968 ते 1978 या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 1972 ते 1975 आणि 1977 ते 1978 या कालावधीत त्यांनी दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले; आणि त्यांच्याकडे समाज कल्याण, गृहनिर्माण, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय, झोपडपट्टी विकास हे विभाग होते.[१][२]ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देखील होते.[३] ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या 22 खंडांच्या मालिकेचे समिती सदस्य होते.[४]

ते साप्ताहिक "प्रबुद्ध भारत" आणि मराठी विश्वकोश, वाई (1962-1966) चे संपादक होते. ते "द रिपब्लिकन" (1960-1962) चे उप-संपादक होते. ते साप्ताहिक "साधना" ट्रस्टचे (1968 - 1978 आणि 1997 पासून) विश्वस्त होते. [१] आंबेडकरांच्या दलित बौद्ध चळवळीपासून प्रेरित होऊन, रुपवते आणि त्यांच्या कुटुंबाने १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला.[५][६][७] त्यांचा मुलगा प्रेमानंद रुपवते हे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते.[२][६][७]

अहमदनगरमधील दादासाहेब रुपवते विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय हे त्यांच्या नावावर आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e "Dadasaheb Rupwate". rupwate.com.
  2. ^ a b c "Its Shirdi LS nominee convicted, Sena eyes Ambedkar aide's son to do the fighting". March 23, 2014.
  3. ^ Merchant, Minhaz (March 14, 2014). "Maharashtra: Sharad Pawar's problems". India Today. Archived from the original on 2021-02-08.
  4. ^ "Our Mission, India Once Again A Buddhist Nation !". www.jaibheem.com. Archived from the original on 2022-05-17. 2022-10-04 रोजी पाहिले.
  5. ^ "कालकथित दादासाहेब रुपवते स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन". www.saamana.com. Archived from the original on 2021-02-08. 2022-10-04 रोजी पाहिले.
  6. ^ a b "ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते प्रेमानंद रुपवते यांचे निधन". Maharashtra Times.
  7. ^ a b Pawar, J. V. "How India's Dalits had to cope when the backlash began after Ambedkar's death". Scroll.in.