तेली
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
तेली ही महाराष्ट्र व भारतासह दक्षिण आशियात अन्यत्र आढळणारी एक जात आहे. पूर्वीच्या काळी तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना 'तेली' या संज्ञेने उल्लेखले जाई. तेली जातीत हिंदू, तसेच इस्लाम या धर्मांचे प्रचलन आढळते. सहसा इस्लामधर्मीय तेली समाजाचा उल्लेख तेली या संज्ञेपेक्षा रोशनदार या संज्ञेने केला जातो. वर्तमान काळात भारतीय प्रजासत्ताकात ही जात इतर मागासवर्गीय जातींत गणली जाते.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- संताजी जगनाडे (अंदाजे इ.स्. १६२४ - इ.स. १६८८) : मराठी संत तुकारामांनी रचलेल्या तुकाराम गाथा या अभंगांच्या संग्रहाचे लेखन यांनी केले. महाराष्ट्रातील देहू गावाजवळच्या सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
- मेघनाद साहा (इ.स. १८९३ - इ.स. १९५६) : भारतीय खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ.
- नरेंद्र मोदी : गुजराती, भारतीय राजकारणी.
- वेंकटेश प्रसाद : कन्नड, भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेट खेळाडू.
- कृष्णा गोमाशे : नगरसेवक, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती, महाराष्ट्र, राजकारणी.
- नारायण तोताराम तेली (पांडव) (इ.स.१८९०ते इ.स.१९७९) स्वातंत्र्य सेनानी, जनसंघ प्रचारक, १९४७ पूर्वीच्या स्वातंत्र्य लढ्यात दोन वेळा त्यांना तुरुंगवास. टाकळी वतपाळ, नांदुरा, जि.बुलढाणा.