Jump to content

तुकाराम ओंबाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुकाराम ओंबळे

मृत्यू: नोव्हेंबर २७, २००८
गिरगाव चौपाटी, मुंबई, महाराष्ट्र, भारत
पुरस्कार: अशोक चक्र
प्रमुख स्मारके: गिरगाव चौपाटी
धर्म: हिंदू
पत्नी: ताराबाई ओंबळे

तुकाराम ओंबळे (? - २६ नोव्हेंबर, इ.स. २००८:मुंबई, भारत) हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक होते. निवृत्तीनंतर ते मुंबईच्या पोलीस खात्यात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यांचा २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला. २६ जानेवारी २००९ रोजी तुकाराम ओंबळे यांना अशोक चक्र हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.२००८ च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पकडण्याचे श्रेय तुकाराम ओंबळे यांना जाते.[१]

सारांश[संपादन]

ओंबळे हे मुंबई पोलिसात साहाय्यक पोलीस निरीक्षक होते. मुंबईवर २६/११/२००८ रोजी झालेल्या हल्ल्याच्या काळात त्यांची तुकडी सशस्त्र नव्हती. अत्यंत तुटपुंज्या शस्त्रांच्या मदतीने त्यांच्या तुकडीने दोनपैकी एका अतिरेक्यास ठार मारले.

अजमल कसाब या अतिरेक्यास पकडताना तुकाराम ओंबाळे यांचा मृत्यू झाला. निःशस्त्र असलेल्या ओंबाळे यांनी जखमी अजमल कसाबची बंदूक धरून त्याला अटक करण्यास अधिकाऱ्यांना मदत केली. पण त्याचवेळी कसाबने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यांचा अंत झाला.

विस्तार[संपादन]

हल्ल्याच्या दिवशी तुकाराम ओंबाळे हे रात्रीच्या पहाऱ्यावर होते. २७ नोव्हेंबर रोजी मध्य रात्री १२:३० वाजता त्यांनी घरी शेवटचा फोन केला होता. अतिरेकी हल्ल्याची खबर मिळताच ते गिरगाव चौपाटीकडे धावले. चौपाटी रोडवर नाकाबंदी करत असतानाच तेथे एक संशयास्पद वाटणारी गाडी थांबली. दोन पोलीस लाठी घेऊन गाडीकडे गेले असता, त्यांना दोन अतिरेकी दिसले, इस्माईल नामक एका अतिरेक्यास जागीच ठार मारण्यात आले. दुसरा अतिरेकी अजमल कसाब जखमी अवस्थेत दिसला. कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबाळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबाळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली , त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण त्या दरम्यान ओंबाळेंच्या शरीरात २० गोळ्या गेल्या होत्या, ते बेशुद्ध पडेपर्यंत बंदुकीसमोर होते, त्यामुळे बाकीच्या पोलिसांनी कसाबला जागेवर थोड्या झटापटीनंतर पकडले.

तुकाराम ओंबाळे यांच्यामुळे मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब पकडला गेला, पण त्या बदल्यात ओंबाळेंना स्वत्ःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली.

अजमल कसाब याला २० नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा कारागृह येथे फाशी देऊन त्याचे तेथेच दफन करण्यात आले .

तुकाराम ओंबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

तुकाराम ओंबाळे यांची पत्नी अशोकचक्र पुरस्कार स्वीकारताना
  • मरणोत्तर अशोक चक्र हा पुरस्कार[२]
  • चौपाटीवर ओंबाळे यांच्या स्मरणार्थ त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.[३]
  • त्यांनी राष्ट्रासाठी केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल त्यांना CNN Indian of the year हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Dec 29, Anahita Mukherji / TNN /; 2008; Ist, 02:56. "'Ombale's courage must be recognised' | Mumbai News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-08-17 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "Ashok Chakra for only two: Karkare and Omble - Indian Express". archive.indianexpress.com. 2020-08-17 रोजी पाहिले.
  3. ^ "ओंबाळेंचा चौपाटीवर पुतळा". Maharashtra Times. 2020-08-17 रोजी पाहिले.

अवश्य पहा[संपादन]