Jump to content

तालिकोटची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
battaglia di Talikota (it); তালিকোটা যুদ্ধ (bn); bataille de Talikota (fr); Битва при Таликоте (ru); तालिकोटची लढाई (mr); Schlacht von Talikota (de); Batalha de Talikota (pt); Cath Talikota (ga); تالیکوٹ دی لڑائی (pnb); 塔里克提之戰 (zh); తళ్ళికోట యుద్ధం (te); Talikota Savaşı (tr); ターリコータの戦い (ja); Pertempuran Talikota (id); Batalla de Talikota (es); معركة تاليكوتا (arz); Bitwa pod Talikotą (pl); തളിക്കോട്ട യുദ്ധം (ml); Battle of Talikota (nl); تالیکوٹ کی جنگ (ur); तालिकोट का युद्ध (hi); ತಾಳೀಕೋಟೆಯ ಯುದ್ಧ (kn); 탈리코타 전투 (ko); Battle of Talikota (en); معركة تاليكوته (ar); ogun Talikota (yo); தலிகோட்டா சண்டை (ta) 1565 battle between the Deccan Sultanates and Vijayanagara Empire (en); 1565 లో విజయనగర సామ్రాజ్యానికి, దక్కన్ సుల్తానుల కూటమికీ జరిగిన యుద్ధం (te); 1565 battle between the Deccan Sultanates and Vijayanagara Empire (en); যুদ্ধ (bn); ogun (yo) Battle of Raksas Tagdi, Battle of Rakshas Tagdi (en)
तालिकोटची लढाई 
1565 battle between the Deccan Sultanates and Vijayanagara Empire
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारलढाई
ह्याचा भागMuslim conquest in the Indian subcontinent
स्थान हंपी, विजयनगर जिल्हा, Kalaburagi division, कर्नाटक, भारत
तारीखजानेवारी २६, इ.स. १५६५
Map१६° २८′ २३.९″ N, ७६° १८′ ४२.६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

तालिकोटची लढाई किंवा राक्कस-तंगडीची लढाई ही विजयनगरचा सम्राट अलिया रामराया आणि दख्खनमधील पाच मुस्लिम सल्तनतींमध्ये लढली गेलेली लढाई होती. २३ जानेवारी, १५६५ रोजी झालेल्या या लढाईत विजयनगरचा पराभव झाला व दक्षिण भारतात अनर्बंध मुस्लिम सत्तेला सुरुवात झाली.

सध्याच्या कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील तालिकोट या छोट्या शहराजवळ ही लढाई झाली. राक्कसगी आणि तंगडगी गावांच्या मधील माळावर झालेल्या या लढाईत सुलतानांचे ८०,००० सैनिक आणि ३०,००० घोडेस्वार आणि सुमारे ५० तोफात तर विजयनगरकडून १,४०,००० सैनिक, १०,००० घोडेस्वार आणि सुमारे १०० हत्ती लढले. लढाईत विजयनगरची सरशी होत असताना रामरायाचे दोन मुसलमान सरदार त्याच्यावर उलटले. त्यांनी रामरायाला रणांगणात कैद केले व तेथेच त्याचा शिरच्छेद केला. हे पाहून विजयनगरचे सैन्य सैरावैरा पळत सुटले व सुलतानांचा विजय झाला. यानंतर अहमदनगरचा निझामशहा, विजापूरचा आदिलशाही, बिदरचा इमादशहा, बेरारचा बरीदशहागोवळकोंडाचा कुतुबशहा यांचे सैन्य विजयनगरची राजधानी हंपीवर चालून गेले व त्या शहराची व आसपासच्या प्रदेशाची त्यांनी अमाप नासधूस केली.