Jump to content

तंग श्यावफिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तंग श्यावफंग या पानावरून पुनर्निर्देशित)
हे चिनी नाव असून, आडनाव तंग असे आहे.
तंग श्यावफिंग (३१ जानेवारी, इ.स. १९७९)

तंग श्यावफिंग (मराठी लेखनभेद: दंग श्यावफंग ; चिनी: 邓小平 ; फीनयीन: Deng Xiaoping ;) (ऑगस्ट २२, इ.स. १९०४; क्वांगान, स-च्वान, चीन - फेब्रुवारी १९, इ.स. १९९७; पैचिंग, चीन) हा चिनी राजकारणी, साम्यवादी राजकीय तत्त्वज्ञ व मुत्सद्दी होता. चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वोच्च नेता असताना, त्याने चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा कल बाजारकेंद्रित अर्थव्यवस्थेकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तंग ची.ज.प्र.च्या राष्ट्राध्यक्षपदावर किंवा 'चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वसाधारण सचिव' या चिनी राजकारणात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पदावर कधीही आरूढ नव्हता; तरीही इ.स. १९७८ ते इ.स. १९९२ या कालखंडात तो चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा परमोच्च नेता होता.

बाह्य दुवे

[संपादन]