Jump to content

मोहन भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॉ. मोहन भागवत या पानावरून पुनर्निर्देशित)
मोहन मधुकर भागवत

मोहन मधुकर भागवत
जन्म: ११ सप्टेंबर, इ.स. १९५०
चंद्रपूर, भारत
चळवळ: हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी , सांस्कृतिक राष्ट्रवाद
संघटना: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
पत्रकारिता/ लेखन: सरसंघचालक
धर्म: हिंदू
प्रभाव: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
वडील: मधुकर भागवत

मोहन मधुकर भागवत (११ सप्टेंबर, इ.स. १९५० - हयात) सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. पेशाने हे पशुवैद्य आहेत. ते आधुनिक विचाराचे असून त्यांना प्रगतिशील नेता समजले जाते. भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात तरुण सरसंघचालकांपैकी आहेत.[].

बालपण

[संपादन]

मूळच्या चंद्रपूरच्या असणाऱ्या भागवतांचा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघात क्रियाशील असणाऱ्या एका कुटुंबात ११ सप्टेंबर, इ.स. १९५० रोजी झाला. .[]. त्यांचे वडील मधुकर भागवत, हे आर.एस.एस.च्या चंद्रपूर विभागाचे अध्यक्ष होते. त्या आधी त्यांनी गुजरातेत प्रांत प्रचारक म्हणूनही काम केले होते.[].मधुकर भागवतांनी लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणले.

मोहन भागवतांचे एक भाऊ हे चंद्रपूर शहराच्या एका शाखेचे मुख्य आहेत. ३ भाऊ व १ बहिणींपैकी मोहन हा सर्वात मोठा आहे.

शिक्षण

[संपादन]

मोहन भागवतांचे प्राथमिक शिक्षण व कॉलेजचे प्रथम वर्षाचे शिक्षण चंद्रपूर येथे झाले.त्यांनी पशुवैद्यक शास्त्रातील पदवी (बी.व्ही.एस्‌सी.अँड डी.एच.) ही पदवी अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठातून घेतली. सन १९७५ मध्ये, देशाच्या तेंव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यांनी लागू केलेल्या आणीबाणीमुळे, त्यांनी पशुवैद्यकातील पदव्युत्तर शिक्षण अर्धवट सोडून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ स्वयंसेवक झाले.[].

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतची जवळीक

[संपादन]

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अल्पकाळ नोकरी केल्यावर,तसेच,आणीबाणीच्या काळात भूमिगत राहिल्यावर, ते इ.स. १९७७ मध्ये अकोला , महाराष्ट्र येथे प्रचारक म्हणून काम करू लागले. संघातील त्यांचे नेतृत्व नागपूर व विदर्भ विभागाचा प्रांत प्रचारक म्हणून उभारून आले.[]. संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाल्यानंतर पुढे प्रांत प्रचारक, अखिल भारतीय शारीरिक प्रमुख यासारख्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ११ मार्च २०००ला त्यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून सलग ९ वर्षे ते या पदावर आहेत.[] सन १९९१ला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह शारीरिक शिक्षण प्रमुख झाले. या पदावर त्यांनी इ.स. १९९९पर्यंत काम केले. त्या वर्षी त्यांना देशातील पूर्णवेळ शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून एका वर्षासाठी निवडले गेले.[]. इ.स. २००० मध्ये, जेंव्हा राजेद्र सिंग व एच.व्ही. शेषाद्रींनी अनुक्रमे सरसंघचालक व मुख्य सचिव या पदावरून तब्येतीच्या कारणास्तव पायउतार व्हायचे ठरविले, त्यावेळी के.एस.सुदर्शन यांना प्रमुख केले गेले व मोहन भागवत यांना मुख्य सचिव या पदावर तीन वर्षासाठी बढती मिळाली. इ.स. २००३ नंतर इ.स. २००६ मध्ये त्यांची त्याच पदावर पुनर्नेमणूक करण्यात आली.[].

मोहन भागवत हे इ.स. २००९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकझाले आहेत. ते ब्रह्मचारी आहेत व त्यांनी भारत व विदेशात भरपूर भ्रमण केले आहे. ते स्पष्टवक्ते, आशावादी व पक्षीय राजकारणांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघास दूर ठेवण्याची स्पष्ट दृष्टी असणारे असे समजले जातात. []

दृष्टिकोण

[संपादन]

भागवत यांचा हिंदुत्वाचा प्रचार करण्यात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न आहे.[].त्यांनी, उच्च व जुन्या भारतीय मूल्यांवर संघाचा पाया मजबूत ठेवून बदलत्या काळासोबत जाण्यावर जोर दिला.[].ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जुने समज व चालीरीतींना चिकटून असतो या प्रसिद्ध समजाविरुद्ध देशातील लोकांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आधुनिकता स्वीकारून त्यासोबत वाटचाल करीत आहे.[].

हिंदू समाजात असलेल्या जातींच्या असमानतेच्या प्रश्नावर भागवत यांनी 'अस्पृश्यतेस थारा नको' असे विधान केले आहे. ते असेही म्हणाले की, 'विविधतेत एकता' या तत्त्वावर आधारित असलेल्या हिंदू समाजाने स्वतःच्याच जातभाईंशी जातिभेद करण्याच्या पूर्वापारच्या प्रथेकडे लक्ष वेधून अश्या भेदभावपूर्ण प्रवृत्ती हटविण्यासाठी पुढाकार घ्यावयास हवा व याची सुरुवात प्रत्येक हिंदू घरातून व्हावयास हवी.[].

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c d e f g h Mohan Bhagwat: A vet and RSS pracharak for over 30 years, 21 March 2009, Times of India, [१] (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  2. ^ लोकसत्ता (http://www.loksatta.com/daily/20090322/mp01.htm. It is a snapshot of the page as it appeared on 26 Jul 2009 07:38:00 GMT.)[permanent dead link]
  3. ^ RSS names Mohan Bhagwat its new chief: ‘pragmatist’ & friend of Advani, Sunday , Mar 22, 2009, Indian Express
  4. ^ a b RSS evolves with changing times: Bhagwat, Sunday, November 20, 2005, Press Trust of India, Indian Express
  5. ^ "Root out discrimination in society, Monday, Jan 29, 2007, The Hindu". 2012-11-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-03 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील
के.सी. सुदर्शन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
२००९ - मार्च २००९
पुढील
सद्य