डेबोरा हेरोल्ड
डेबोरा हेरोल्ड |
---|
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
डेबोरा हेरोल्ड हिचा जन्म १८ फेब्रुवारी १९९५ रोजी एबरडीन, अंदमान आणि निकोबार बेटे येथे झाला. ही एक भारतीय सायकलपटू आहे. [१]
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
[संपादन]हेरोल्ड एक निकोबारी आहे. ती कार निकोबारमध्ये मोठी झाली. तिचे वडील हवाई दलात अधिकारी म्हणून काम करत होते. २००४ ची त्सुनामी आली तेव्हा ती कार निकोबार बेटावरील तिच्या गावात होती आणि सुमारे एक आठवडा ती झाडात अडकली होती. त्यावेळी पानांवर आणि झाडाच्या सालांवर तिला गुजराण करावी लागली.
तिला तिच्या क्रीडा प्रकारातील वाटचाली साठी अंदमानमधील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) कडून मदत मिळाली. २०११ पासून, ती नवी दिल्ली येथे राहते आणि इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील वेलोड्रोम येथे प्रशिक्षण घेत आहे.
कारकीर्द
[संपादन]ही आंतरराष्ट्रीय मानांकन (uci ranking) मिळवणारी भारताची पहिली सायकलपटू आहे. तिला २०१५ मध्ये 500 मीटर वेळ चाचणी या प्रकारात चौथे मानांकन मिळाले होते.[२]
२०१४ - ट्रॅक आशिया कप- तीन सुवर्णपदके- 500 मीटर वेळ चाचणी, महिला स्प्रिंट आणि महिला एलिट टीम स्प्रिंट (केझिया वर्गीस बरोबर)[३]
२०१५ ऑक्टोबर- तैवान कप ट्रॅक इंटरनॅशनल क्लासिकमध्ये पाच पदके जिंकली. (महिला एलिट स्प्रिंट प्रकारात सुवर्ण पदकासह नवा उच्चांक)[४]
२०१५ नोव्हेंबर- ट्रॅक एशिया कप- एक सुवर्ण- महिला एलिट स्प्रिंट , दोन रजत- 500 मीटर वेळ चाचणी, महिला एलिट टीम स्प्रिंट (केझिया वर्गीस बरोबर)[५] [४]
तिच्या या पराक्रमामुळे सायकलिंग जगताला भारतीय टीमची नोंद घेणे भाग पडले.
२०१६ सप्टेंबर - ट्रॅक एशिया कप- तीन सुवर्ण- महिला एलिट ५०० मि स्प्रिंट, महिला एलिट टीम स्प्रिंट (केझिया वर्गीस बरोबर), काइरेन प्रकारात रजत पदक[६][७]
२०१६ - तैवान कप ट्रॅक इंटरनॅशनल क्लासिक- रजत- 500 मीटर वेळ चाचणी[८], महिला एलिट स्प्रिंट[९]
२०१७- ट्रॅक एशिया कप- दोन रजत पदके- महिला एलिट ५०० मि स्प्रिंट, महिला एलिट टीम स्प्रिंट (अलिना रेजी बरोबर). काइरेन प्रकारात पाचवे स्थान [१०][११]
मध्ये गुढघ्याच्या दुखापती मुळे काही काळ स्पर्धे बाहेर रहावे लागले.[१२]
२०१८- ट्रॅक आशिया कप- रजत- महिला एलिट टीम स्प्रिंट (सोनाली चानू बरोबर)[१३][१४]
२०१९ - ट्रॅक आशिया कप- ब्रॉंझ पदक - महिला एलिट टीम sprint (अलिना रेजी बरोबर)[१२] [१५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Nicobar's bicycle diaries". 6 October 2018.
- ^ Alter, Jamie (December 12, 2015). "Tsunami survivor Deborah Herold is world No. 4 cyclist". द टाइम्स ऑफ इंडिया. December 28, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Medallists by event" (PDF). cfiindia.in. 2014.
- ^ a b Alter, Jamie (20 November 2015). "Track Asia Cup: Indian cyclists finish third with 11 medals". Times of India.
- ^ "Medalist" (PDF). cfiindia.in. 2015.
- ^ "India finish second with 8 medals on final day of Track Asia Cup 2016". Indian Express. 16 September 2016.
- ^ "Medalist" (PDF). cfiindia.in. 2016.
- ^ "Medalist" (PDF). cycling.org.tw. 2016.
- ^ "Medalist" (PDF). cycling.org.tw. 2016.
- ^ "India top medal tally in Track Asia Cup". Times of India. 12 October 2017.
- ^ "Medalist" (PDF). cfiindia.in.
- ^ a b Nair, Abhijit (12 December 2020). "India's 10 most successful cyclists at International level". thebridge.in.
- ^ "Medal List" (PDF). cyclingfederationofindia.org.
- ^ "Medalist" (PDF). cfiindia.in.
- ^ "Medalist" (PDF). cfiindia.in.