Jump to content

टेक्सटबुक रेजाइम्स (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टेक्सटबुक रेजाइम्स: अ फेमिनिस्ट क्रिटीक ऑफ नेशन अंड आयडेंटीटी[] हे भारतातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रवाद, ओळख व लिंगभाव यांचे संबंध सांगणारे प्रकाशित अहवाल आहे. भारतीय स्त्रीवादी संघटना निरंतर यांनी तमिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगालउत्तर प्रदेश मधील स्त्री अभ्यास केंद्रांच्या सहाय्याने सदरचा अभ्यास केला. हा आढावा प्रथम २००९ला व नंतर २०१०ला निरंतर द्वारे प्रकाशित केला गेला.

अभ्यासाचे उद्देश

[संपादन]

या अभ्यासात राष्ट्रीय पातळीवरील नैतिक शास्त्र, समाज शास्त्रभाषा या विषयांवरील शालेय पाठ्यपुस्तक ज्याद्वारे राष्ट्र व वैयक्तिक/सामूहिक ओळख याबबत विचार घडतात यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच लिंगभाव व सामाजिक कोटीक्रम हे कशे एक दुसऱ्यांना छेदतात हे बघणे या अभ्यासाचा उद्देश्य आहे. ज्या चार राज्यांमध्ये हा अभ्यास केला गेला, त्याचा आढावा या अहवालाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे.[] पित्रुसत्तेची सुरुवात खऱ्या अर्थाने पाठ्यपुस्ताकामधूनच होते आणि शाळांच्या माध्यमातून लिंगभाव घडवला जातो असे ह्या पुस्तकाचे केंद्रीय विधान आहे. []

संदर्भ सुची

[संपादन]
  1. ^ Textbook Regimes: A Feminist Critique of Nation and Identity : an Overall Analysis (इंग्रजी भाषेत). Nirantar. 2009.
  2. ^ "India: Sexism and Patriarchy in the Textbooks - South Asia Citizens Web". www.sacw.net (इंग्रजी भाषेत). 2017-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Patriarchy begins with the textbook". https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2013-01-09. 2018-03-31 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)