Jump to content

टी.एम.पी. महादेवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रोफेसर टी.एम.पी. महादेवन तथा तेल्लीयावारम महादेवन पोन्नबालम महादेवन (इ.स. १९११[ दुजोरा हवा] - ५ नोव्हेंबर, इ.स. १९८३) हे तत्त्ववेत्ते होते. ते मद्रास विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि तेथील ॲडव्हान्स्ड स्टडी इन फिलॉसॉफीचे संचालक होते[] त्यांच्या पुढाकाराने तेथे १९६४ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सेंटर फॉर ॲडव्हॉन्स स्टडी इन इंडियन फिलॉसॉफी हे केंद्र स्थापन करण्यात आले. [] त्यांनी केलेले रमण महर्षी यांच्या मी कोण? या व्याख्यानाचे तमिळमधून इंग्लिशमध्ये भाषांतर [] महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी ग्रेस ऑफ शंकर इनकार्नेट हे आदी शंकराचार्यांचे चरित्र लिहले.[] अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या निमंत्रणावरून तेथे भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि आध्यात्मिक परंपरबद्दलचे वर्ग घेण्यासाठी महादेवन गेले होते. तेथील वास्तव्याच्या कालावधीत त्यांनी तेथील ओलीन ग्रंथालयात भारतीय तत्त्वज्ञान विषयक आणि आध्यात्मिक विषयक पुस्तकांची मोठी दालने उभी केली.[]

पीएचडी प्रबंधाचे वैशिष्ट्य व मूल्य

[संपादन]

प्रोफेसर महादेवन यांचा The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha- Vidyaranya हा पीएचडीचा प्रबंध म्हणजे शृंगेरी मठाचे स्वामी भारतीतीर्थ-विद्यारण्य यांनी अद्वैत वेदान्तात जी भर घातली त्याच्या अनुषंगाने अद्वैत वेदान्ताचा आधुनिक भारतास आधुनिक भाषेत करून दिलेला परिचय मानला जातो[], मद्रास विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख, दिग्गज प्रोफेसर आणि भारतीय तत्त्ववेत्ते एस. एस. सूर्यनारायण शास्त्री हे त्यांचे मार्गदर्शक होते. महादेवन यांचे पीएचडीचे संशोधन कार्य १९३३-३५ दरम्यान झाले.

प्रबंधाचा विषय

[संपादन]

आदी शंकराचार्यांच्यानंतर अद्वैत वेदान्ताचा झालेला प्रसार व प्रचार आणि कार्य जनसामान्य लोकांनाच नव्हे तर अभ्यासकांनाही फारसे माहित नसते. आदी शंकराचार्यांच्यानंतर, म्हणजे आठव्या शतकानंतर वेदान्ताच्या इतिहासातील अन्य नाव म्हणजे भारतीतीर्थ विद्यारण्य. स्वामी भारतीतीर्थ-विद्यारण्य हे चौदाव्या शतकातील अद्वैत वेदांती आचार्य होते. ते विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहर (पहिला) आणि बुक्क घराण्याचे गुरू होते. १३७७ ते १३८६ दरम्यान त्यांनी शृंगेरी मठाची गादी चालविली.[]त्यांनी वेदान्ताचे अर्थ विवरण वेगळ्या रीतीने केले आणि परंपरेतील विवरण संप्रदायात मोलाची भर टाकली, असे महादेवन नमूद करतात.[] त्यांचे पंचदशी आणि दृक –दृश्य विवेक हे दोन ग्रंथ मूलभूत मानले जातात, असे महादेवन नमूद करतात.[]

प्रबंधाची प्रसिद्धी व प्रकाशन

[संपादन]

हा प्रबंध १९३८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यास डॉ. राधाकृष्णन यांनी प्रस्तावना लिहिली आहे. हा ग्रंथ महादेवन यांनी त्यांचे थोरले बंधू स्वामी राजेश्वरानंदजी[१०]यांना अर्पण केला आहे. या प्रबंधाची दुसरी आवृत्ती १९५७ मध्ये प्रकाशित झाली. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने अमोल ठेवा म्हणून ती जतन केली आहे. ती येथे Archived 2016-03-03 at the Wayback Machine. उपलब्ध आहे. त्यांचा अद्वैत तत्त्वज्ञानाचे चिंतनाचे परिष्कृत रूप त्यांच्या Gaudapada - A Study in Early Advaita या ग्रंथात दिसते. हा ग्रंथ मद्रास विद्यापीठाने १९५२मध्ये प्रसिद्ध केला.[११]

महादेवन यांच्या स्मरणार्थ

[संपादन]

महादेवन यांच्या स्मरणार्थ चेन्नई येथे डॉ. टी. एम. पी. महादेवन फौंडेशनची[१२] १७ जून १९९३ रोजी [१३] स्थापना करण्यात आली. ग्रीसच्या शाही घराण्याची महाराणी प्रिन्सेस इरिन[१४] या फौंडेशनची सदस्य असून ग्रीस येथे १९६६मध्ये भरलेल्या जागतिक तत्त्वज्ञान परिषदेत त्या महादेवन यांच्या व्याख्यानामुळे अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांनी मनाने हिंदू धर्म स्वीकारला[१५].२०१३मध्ये "The Philosophy of Prof T M P Mahadevan" या विषयावर मद्रास विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाने चर्चासत्र आयोजित केले होते.[१६]

शिक्षण

[संपादन]
  • १९३३ बी. ए. : तत्त्वज्ञान , प्रथम श्रेणी, मद्रास विद्यापीठ.
  • ? एम.ए. : तत्त्वज्ञान , प्रथम श्रेणी, मद्रास विद्यापीठ.
  • १९३७ : पीएचडी : मद्रास विद्यापीठ

कारकीर्द

[संपादन]
  • १९३६ : प्रोफेसर, तत्त्वज्ञान विभाग, मद्रास विद्यापीठ
  • १९४८-४९ : कार्नेल, हवाई, पॅरिस, क्वोटो, ह्युस्टन, कॉलोराडो आणि इत्यादी ठिकाणी विद्यापीठांमध्ये व्याख्याने
  • १९५५: अध्यक्ष - इंडिअन फिलॉसॉफिकल काँग्रेस, नागपूर
  • १९६६ : रॉयल नॅशनल फौंडेशन, अथेन्स - जागतिक तत्त्वज्ञान चर्चासत्र.

मानद संपादक

[संपादन]

Indian Philosophical Quarterly[१७]

पुरस्कार

[संपादन]

१९६७ : पद्मभूषण

ग्रंथ संपदा

[संपादन]

महादेवन यांचे ग्रंथलेखन [१८][१९]

  1. The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha Vidyaranya
  2. Gaudapada - A Study in Early Advaita
  3. Time and Timeless
  4. Outlines of Hinduism
  5. The Fundamentals of Logic
  6. Sambandha-Vartika of Suresvaracarya
  7. The Idea of God in Saiva Siddhanta
  8. Ramana Maharshi and His Philosophy of Existence
  9. Sankaracharya and The Sage of Kanci
  10. A Morning Prayer and Hymn to Dakshinamurti
  11. Isavasya Upnishad
  12. Whither Civilization and Other Broadcast Talks

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ http://www.unom.ac.in/index.php?route=schools/philosophyreligious.
  2. ^ http://www.unom.ac.in/index.php?route=schools/philosophyreligious.
  3. ^ "संग्रहित प्रत". 2015-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-05 रोजी पाहिले.
  4. ^ Dr. T.M.P. Mahadevan, Grace of Sankara Incarnate, http://www.kamakoti.org/souv/5-14.html
  5. ^ http://www.paulbrunton.org/links-new.php
  6. ^ महादेवन यांचे मनोगत, PREFACE TO FIRST EDITION, xii, 01 August 1938, The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha- Vidyaranya, http://cincinnatitemple.com/articles/Philosophy-of-Vedanta-T-M-P-Mahadevan.pdf Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
  7. ^ महादेवन यांचे मनोगत, PREFACE TO FIRST EDITION, xiii, 01 August 1938, The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha- Vidyaranya, http://cincinnatitemple.com/articles/Philosophy-of-Vedanta-T-M-P-Mahadevan.pdf Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
  8. ^ महादेवन यांचे मनोगत, PREFACE TO FIRST EDITION, xiii, 01 August 1938, The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha- Vidyaranya, http://cincinnatitemple.com/articles/Philosophy-of-Vedanta-T-M-P-Mahadevan.pdf Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
  9. ^ T-M-P-Mahadevan, INTORDUCTION, The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha- Vidyaranya, http://cincinnatitemple.com/articles/Philosophy-of-Vedanta-T-M-P-Mahadevan.pdf Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
  10. ^ महादेवन यांचे मनोगत, PREFACE TO FIRST EDITION, xiii, 01 August 1938, The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha- Vidyaranya, http://cincinnatitemple.com/articles/Philosophy-of-Vedanta-T-M-P-Mahadevan.pdf Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
  11. ^ महादेवन यांचे मनोगत, PREFACE TO REVISED EDITION, ix, The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha- Vidyaranya, 12 November 1957, http://cincinnatitemple.com/articles/Philosophy-of-Vedanta-T-M-P-Mahadevan.pdf Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
  12. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-05 रोजी पाहिले.
  13. ^ नोंदणी विभाग, तामिळनाडू शासन,http://www.tnreginet.net/english/g_soc2.asp?socno=199300302&dist=1 Archived 2016-03-05 at the Wayback Machine.
  14. ^ "संग्रहित प्रत". 2015-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-05 रोजी पाहिले.
  15. ^ http://www.kamakoti.org/souv/5-35.html
  16. ^ The New Indian Express, Published: 27th March 2013,National seminar on Philosophy at Madras University, http://www.newindianexpress.com/cities/chennai/article1518334.ece Archived 2016-03-04 at the Wayback Machine., ०९ सप्टेंबर २०१५
  17. ^ Editorial, page 137 Indian Philosophical Quarterly,http://unipune.ac.in/snc/cssh/ipq/english/IPQ/11-15%20volumes/11%2001/PDF/11-1-10.pdf
  18. ^ "संग्रहित प्रत". 2015-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-05 रोजी पाहिले.
  19. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2016-03-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-09-05 रोजी पाहिले.