झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Zbigniew Brzezinski, 1977.jpg

झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की (Zbigniew Brzezinski) (२८ मार्च, इ.स. १९२८:वर्झावा, पोलंड - २६ मे, इ.स. २०१७:अमेरिका) हे अमेरिकी मुत्सद्दी होते.

ब्रेझिन्स्की हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे सुरक्षा सल्लागार होते, १९८०च्या दशकात जागतिक राजकारणातील घटनांचे तेवा निर्माते होते. त्यांनी याबद्दल लेखनही केले.

पूर्वायुष्य[संपादन]

ब्रेझिन्स्की यांचे वडील पोलंडमधील उमराव होते. कॅनडात राजनैतिक अधिकारी असतान पोलंडवर आधी जर्मनीने आणि मग सोव्हिएट रशियाने वर्चस्व मिळविण्याचा पर्यत्न केल्याने ब्रेझिन्स्की कुटुंब परत पोलंडला नजाता अमेरिकेत आश्रयाय गेले.

झिबिग्न्यू कॅनडातून पदवीधर झाले व हार्वर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. तेथे तत्कालीन सोव्हिएट रशियाचे अभ्यासक मर्ल फेन्सोड हे त्यांचे मार्गदर्शक होते. त्यामुळे ब्रेझिन्स्की यांचाही रशिया हा अभ्यासाचा विषय बनला.

अध्यापन आणि लेखन[संपादन]

आधी हार्वर्डमध्ये आणि नंतर कोलंबिया विद्यापीठात ब्रेझिन्स्की यांनी केले. या काळात त्यांनी सोव्हिएट रशियाविषयक लिखाण केले व ते रशिया विशेषज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.

पीसफुल एंगेजमेन्ट[संपादन]

१९६५ साली एका आंतरराष्ट्रीय विषयांवरील परिषदेत झालेल्या परिसंवादात बोलतान सोव्हिएट रशियाविषयी भाष्य करताना ब्रेझिन्स्की यांनी पीसफुल एंगेजमेंट असा शब्दप्रयोग केला, तो पुढे रूढ झाला. आपल्या शत्रूला निष्प्रभ करण्यासाठी त्याला प्रेमाने कवेत घेणे हादेखील प्रभावशाली मार्ग असू शकतो, हे त्यांचे त्यावर स्पष्टीकरण. तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी पीसफुल एंगेजमेन्ट हा शब्दप्रयोग आपल्या परराष्ट्र धोरणासाठी जसाच्या तसा उचलला.

जिमी कार्टर यांचे सुरक्षा सल्लागार[संपादन]

अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यावर अध्यक्ष जिमी कार्टर यांनी ब्रेझिन्स्की यांची सुरक्षा सल्लागारपदावर नेमणूक केली.

परराष्ट्र धोरणाला दिशा[संपादन]

ब्रेझिन्स्की आणि माजी परराष्ट्रमंत्री हेन्‍री किसिंजर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र राजकारणास दिशा दिली. अमेरिकेचे चीनबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यामागे ब्रेझिन्स्की यांचा हात होता.

अफगाणिस्तानात रशियाचे व्हिएटनाम करण्याची संधी आहे असे ब्रेझिन्स्की यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पटविले.

ब्रेझिन्स्की यांनी अध्यक्ष कार्टर यांच्यासाठी पश्चिम आशियासाठीचे धोरण तयार केले. या परिसरात हातपाय पसरणार्‍या रशियाला रोखायचे असेल तर पूर्व युरोप आणि पश्चिम आशियातील मुस्लिमबहुल देशांतील नेत्यांची कमान (आर्क ऑफ इस्लाम) बांधावी हा ब्रेझिन्स्की यांचाच सल्ला. अश्या नव्या कल्पना ब्रेझिन्स्की यांनी मांडल्या आणि युद्धखोरीला विरोध कायम ठेवून पीसफुल एंगेजमेंटचा पुरस्कार केला.