ज्याँ बोसेजू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्याँ बोसेजू

ज्याँ आंद्रे एमानुएल बोसेजू कोलिक्वेओ (स्पॅनिश: Jean André Emanuel Beausejour Coliqueo; जन्म: १ जून, १९८४ (1984-06-01), सान्तियागो, चिली) हा एक चिलीयन फुटबॉलपटू आहे. २००४ सालापासून चिली संघाचा भाग असलेला बोसेजू आजवर २०१०२०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलीसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर बोसेजू २००९-१० दरम्यान ब्राझीलमधील क्लब अमेरिका, २०१०-१२ दरम्यान प्रीमियर लीगमधील बर्मिंगहॅम सिटी एफ.सी. तर २०१२ पासून विगन ॲथलेटिक एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]