Jump to content

जोसेफ फ्रीहेर वॉन आयशेंडॉर्फ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोसेफ फ्रीहेर वॉन आयशेंडॉर्फ (१० मार्च १७८८ – २६ नोव्हेंबर १८५७ ). १९ व्या शतकातील एक जर्मन कवी, कादंबरीकार, नाटककार, साहित्यिक, समीक्षक, अनुवादक आणि मानववंशशास्त्रज्ञ. स्वच्छन्दतावादाचे (रोमँटिझम) एक प्रमुख लेखक आणि समीक्षक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. प्रशियातील सिलेसियात एका जहागीरदाराच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण हीडलबर्ग विद्यापीठात झाले. सुरुवातीला प्रशिया सरकारचे प्रशासक म्हणून विविध पदांवर त्यांनी काम केले. सेवानिवृत्तीपर्यंत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रीव्ही काऊन्सलर म्हणून त्यांनी काम केले.आयशेंडार्फ यांच्या कलात्मक विकासावर फ्रिडरीच श्लेगेल व जोसेफ गॅरेस यांचा प्रभाव होता.

त्यांच्या काही कादंबऱ्या व इतर लेखन – अहनंग अंड गेजेनवर्ट, मिट ईनेम वोरवॉर्ट वॉन डे ला मोठे फूक्वे, डिक्टर अंड इहेरे जेझेलिन, डाय झौबेरी आयएम हर्बस्टे, दास मार्मरबिलिड, व्हायल लॉरमेन उमेदवार निकट्स, आयन मेफाहर्ट, दास स्लो डोरांडे, लिबर्टास अंड इफे फ्रीअर. याशिवाय कविता, लेख, काही नाटके त्यांनी लिहिली आहेत.

फ्रेडरिक श्लेगेल यांनी जर्मन साहित्यात रोमँटिश्च (रोमँटिक) हा शब्द स्थापित केला तर जोसेफ गॅरेस यांनी सौंदर्य व काव्याला महत्त्व दिले. या दोघांच्या विचाराचा, कार्यांचा जर्मन बौद्धिक जीवनावर अनेक अंगांनी प्रभाव पडला. आयशेंडार्फ यांनी जग हे एक नैसर्गिक आणि चिरस्थायी स्वतःची रचना असणारी कलाकृती आहे असे सांगितले.

त्यांच्या कवितांवर लोकगीताचा प्रभाव होता. त्यांच्या कवितेमध्ये साध्या ओळीच्या रचनेपासून सोनेट्सपर्यंतच्या अनेक  काव्यप्रकाराचा समावेश आहे. पण मुख्य लक्ष लोकगीतांकडे होते. आयशेंडार्फ यांच्या कविता काळाची क्षणभंगुरता व परंपरा यांचा मिलाफ होता. त्यांच्या मते वेळ ही केवळ नैसर्गिक घटना नाही तर प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्रीला एक मेटाफिजिकल (अधिभौतिक) आयाम असतो. त्यांनी उशिरा धार्मिक व लेखराजकीय ले.

परंतु त्यांच्या कविता मात्र त्यांच्या व्यक्तिगत दृष्टिकोनावर आधारित आहे. त्यांच्या भावकवितातून जन्मभूमी विषयी प्रेम, निसर्गाची ओढ, अतृप्त प्रीती आणि अज्ञाताचा शोध दिसून येतो. तसेच लयबद्धता, गेयता आणि सुडौल भाषाशैली यांचाही संयोग दिसून येतो. आयशेंडार्फ त्यांच्या साहित्यिक प्रणयरम्यतेच्या प्रतीकात्मक विश्वातच रमले.

आयशेंडार्फ यांच्या भाषेत कृत्रिमता नाही. तर कोशीय परिभाषेपेक्षा अधिक अर्थसघन असलेल्या साध्या शब्दाचा ते वापर करतात. या अर्थाने त्यांचे शब्द वैचारिक शक्तीने, कल्पनारम्य स्वरूपात आणि मधुर शैलीने समृद्ध आहेत. त्यांच्या कविता आजही जर्मनीच्या संगीत विश्वात लोकप्रिय आहेत. आयशेंडार्फ यांचे निधन निट्स, सिलेसिया, किंग्डम ऑफ प्रशिया येथे झाले. जोहानेस बॉझ यांनी रॅटिबॉर मध्ये त्यांचे स्मारक तयार केले होते पण नंतर ते काढले गेले.