जोमो केन्याटा
जोमो केन्याटा | |
केन्याचा पहिला राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ १२ डिसेंबर १९६४ – २२ ऑगस्ट १९७८ | |
पुढील | डॅनियेल अराप मुआ |
---|---|
केन्याचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ १ जून १९६३ – १२ डिसेंबर १९६४ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
जन्म | २० ऑक्टोबर १८९१ किकुयू, ब्रिटिश पूर्व आफ्रिका |
मृत्यू | २२ ऑगस्ट, १९७८ (वय ८६) मोम्बासा, केन्या |
अपत्ये | उहुरू केन्याटा व इतर ७ |
जोमो केन्याटा (Jomo Kenyatta; २० ऑक्टोबर १८९१ − २२ ऑगस्ट १९७८) हा केन्या देशाचा स्वातंत्र्यसेनानी, पहिला पंतप्रधान व पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९६३ ते मृत्यूपर्यंत केन्याचे नेतृत्व करणाऱ्या केन्याटाला देशाचा जनक मानले जाते.
केन्याटाचा जन्म तत्कालीन पूर्व आफ्रिकेतील किकुयू प्रदेशात २० ऑक्टोबर १८९१ रोजी झाला. त्याच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यु झाल्याने त्याचे आजोबा आणि काकांनी जोमो यांचे संगोपन केले. किकुयू मधील क्रिश्चन शाळेत जोमोचे प्राथमिक शिक्षण झाले. ह्या शाळेतील धार्मिक विचारांच्या प्रभावामुळे त्याने १९१४ साली ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्याने स्वतःचे नाव आधी जॉन पीटर असे ठेवले पुढे ते नाव बदलून त्यांनी स्वतःचे नाव जॉनस्टन कमाऊ असे ठेवले. शिक्षण संपल्यानंतर जोमो केन्याटा नैरोबी येथे गेला. तेथील नगर प्रशासनाच्या पाणी वाटप विभागात त्याला नोकरी मिळाली. १९२४ साली त्याने राजकारणामध्ये प्रवेश केला.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |