जैविक त्वचा
त्वचा ही सजीवप्राणी, वनस्पती व् मानवी शरीराचा एक अवयव आहे. या अवयवास स्पर्शाची जाणीव होते. त्वचा अनेक पदरांनी बनलेली असते. त्वचेची हानी झाली असता खपली धरून त्वचा परत भरून येते. खपलीचा रंग त्वचेपेक्षा बहुधा वेगळा असतो.
मानवी त्वचेचा रंग भौगोलिकतेनुसार भिन्न असल्याचे आढळते.
मानवी त्वचेचे भाग[संपादन]
मानवी त्वचेचे अनेक पदर असल्याने त्वचेची हानी झाली असता भरून यायला मदत होते. त्वचेच्या अगदी वरील भागात असलेल्या रक्तवाहिन्या अधिकाधिक सूक्ष्म होत जातात.
त्वचेचे कार्य[संपादन]
त्वचेमुळे आतील स्नायू, हाडे कूर्चा आदी अवयवांचे रक्षण होते. मानवी त्वचा हे रक्षणाचे कार्य करतेच शिवाय तापमान नियंत्रणाचेही काम करते. त्वचा ड जीवनसत्त्व शोषून घेते व ब जीवनसत्त्व राखून ठेवायला मदतरूप होते.
त्वचेची स्वच्छता[संपादन]
शरीर त्वचेची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करत असते. घामातून स्रवणारी द्रव्ये अनेक त्वचेला मारक असणाऱ्या विषाणूंचा नाश करतात. तसेच त्वचेचा अतिशयव वरील पदर हा सतत गळून जात असतो. यामुळे आपोआपच स्वच्छता राखली जाते.
त्वचेचे वय वाढणे[संपादन]
वय वाढत जातांना त्वचेची ताणली जाण्याची शक्ती कमी होते व त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात.
त्वचाविकार[संपादन]
त्वचेला अनेक प्रकारचे विकार होऊ शकतात. अतिनील किरणांमध्ये जास्त वेळ रहिले असता त्वचेचा कर्करोग उद्भवतो. तसेच भाजले असता त्वचेवर फोड येतात.त्वचा हि सेल्स पासून बनते. त्वचेचे तीन लेयर पडतात. त्वचा विकारांचे मुख्य कारण आजची बदललेली जीवन शैली आणि विषयुक्त रसायनांचा अति वापर आहे.
त्वचेचे रंग[संपादन]
भौगिलिक परिस्थितीनुसार त्वचेचा रंग ठरतो आणि बदलतो. === त्वचेचे प्रकार === त्वचेचे प्रकार सामान्य त्वचा ,कोरडी त्वचा, सवेंदनशील त्वचा, आशे तीन प्रकार आहे.
वनस्पतींची त्वचा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- रहस्य त्वचेचं! (मानवी त्वचा) (मराठी मजकूर)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते. |