Jump to content

जेम्स (संगीतकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेम्स (संगीतकार)
ट्राय नेशन मेगा फेस्टिवल मध्ये सदर करतांना जेम्स, २०१२
जन्म नाव फारूक मेह्फुझ आनम
टोपणनाव नगर बओल, गुरू, जेम्स
जन्म

२ ऑक्टोबर, १९५७ (1957-10-02) (वय: ६७)
नावगाव, बांगलादेश

कार्यक्षेत्र=गायक-संगीतकार, अभिनेता
संगीत प्रकार सायकेडेलिक रॉक, हार्ड रॉक, Hard rock
वाद्ये गिटार, बेस, खामोक, कीबोर्ड, ड्रम, साक्सोफोन, बासरी, पर्कुषण
कार्यकाळ 1977–present
रेकॉर्ड कंपनी सरगम, साऊंडटेक, शंगीत, सोनी बी. एम. जी.

फारूक मेह्फुझ आनम तथा जेम्स किंवा गुरू [] (बांग्ला: ফারুক মাহফুজ আনাম), हा एक बांगलादेशी गायक, गिटार वादक व संगीतकार आहे.[][][][] जेम्स हा सध्या नगर बओल याया गटाचा मुख्य गिटार वादक व गायक आहे. त्याने काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुद्धा गाणी गायली आहेत.[] जेम्स हा १९९० च्या दशकात 'फिलिंग्स (ज्याचेच आता नाव नगर बओल आहे) संगीतसमूहाचा गायक म्हणून प्रसिद्ध झाला. फिलिंग्सला बांगलादेशात रॉक संगीत प्रसिद्ध करणारे तीन संगीतसमूहांपैकी एक समजले जाते. एल.आर.बी.आर्क हे इतर दोन संगीतसमूह आहेत. बांगलादेशात सायकेडेलिक रॉकचा जनक जेम्सला समजले जाते.[]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

जेम्सचा जन्म नावगाव येथे झाला व टो राजशाही व चीत्तागोंग येथे मोठा झाला. त्याचे वडील एक सरकारी कर्मचारी होते व पुढे चालून ते चीत्तागोंग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाले. त्याच्या पौन्गड वर्षांपासूनच जेम्सने संगीतात उत्सुकता दाखविली, पण ज्यामध्ये त्याच्या परिवाराने नकार दिला व त्याचे समर्थन नाही केले. त्याने १९७३ साली सातव्या वर्गात असताना मित्रांसोबत पहिल्यांदा गिटार वाजवले.[] त्याच्या कुटुंबासोबत झालेल्या मोठ्या वादानंतर, जेम्सने आडव्या वर्गात असतांनाच घर सोडले व अझीझ बोर्डिंग नावाच्या वसतिगृहात राहायला सुरुवात केली. तिथेच तो 'फिलिंग्स'च्या सदस्यांना भेटला व त्याच्या संगीत कार्कीर्दाचा फिलीन्ग्सचा गायक व मुख्य गिटार वादक म्हणून सुरुवात झाली.

संगीत कारकीर्द

[संपादन]

१९८० मध्ये काही सदस्यांने फिलिंग्स सोडल्या नंतर, जेम्स, फंटी, पाब्लो व स्वपन ह्यांने गट पुन्हा सुरू केला व स्थानिक  कार्यक्रमांमध्ये संगीत सदर करायला सुरुवात केली. त्यावेळची मांडणी अशी होती :

  • जेम्स - मुख्य गिटार व गायन
  • फंटी - ड्रम
  • पाब्लो - कीबोर्ड व गायन
  • स्वपन - बेस गिटार

संगीतकारांमध्ये तो ' 'मार्क नोफ्लर'ला योग्य अदेने गाणारा ' प्रसिद्ध झाला. रंगभूमी वर अनेक वर्षाच्या कार्यक्रमांनंतर त्यांने 'स्टेशन रोड' नावाचा पहिला अल्बम ढाका येथे तयार व रेकोर्ड केला. त्यातील सर्व गाण्यांना जेम्सने संगीत दिले व ५ गाण्यांचे बोल पण त्याने लिहिले. तो अल्बम हिट जरी नसला तरी 'अगेर जोनोम', 'अमाई जेते दाव' व 'रुप्शागोर' ह्या गाण्यांनी मध्य प्रसिद्धी मिळाली.

१९९३ मध्ये त्यां ने 'जेल ठेके बोलछी' (जेलामधले बोल) हा त्यांचा दुसरा अल्बम प्रकाशित केला. हा अल्बम खूप प्रसिद्ध झाला व फिलिंग्स हा एक बहुचर्चित गट बनला.

बांगलादेश

[संपादन]

जेम्स हा सायकेडेलिक व ब्लूज संगीत गातो. त्याने जिम मोरीसन, मार्क नोफ्लर व एरिक क्लापटन ह्यांना त्याचे संगीतातील प्रेरणास्थान म्हणन सांगितले आहे. जेम्स साठी बऱ्याच प्रसिद्ध गीतकारांने गाणी लिहिली आहेत; उदा. कवी शाम्सुर रेहमान, शिबली, देहोलोवी, इत्यादी. लकी अखंड व मानम अहमद ह्यांसारख्या संगीत्कारांने जेम्ससाठी गाणीही लिहिली आहे. जेम्सने पुढे चालून 'फिलिंग्स'ला नगर बओल हे नाव दिले. नगर बओल या नावाखाली त्यांचा एकमेक अल्बम २००१ सालचा 'दुष्तु चेलेर डोल' हा आहे.

बॉलीवूड

[संपादन]

१९९० च्या दशकापासून जेम्स हा बांगलादेश व पश्चिम बंगाल येथील सुप्रसिद्ध संगीतकार राहिला आहे. जेम्स २००४ मध्ये प्रीतम ह्या बॉलीवूडमधील बेंगाली संगीतकाराला भेटला. २००५ मध्ये गॅंगस्टर ह्या बॉलीवूड चित्रपटामध्ये जेम्सने गाणे गायले. त्या चीत्रापातातील मुख्य गाण 'भिगी भिगी' हे मोठ्या पातळीवर सुप्रसिद्ध झालं. ते सुमारे एक महिना बॉलीवूडच्या गाण्यांच्या यादीत शीर्षस्थानी राहिलं.[] त्याने प्रीतमसोबत परत एकदा जोडी बनवून 'वो लम्हे' मधील 'चाल चले', व 'लाईफ इन ए मेट्रो' मधील 'रिश्ते' व 'अलविदा (रिप्राइज)' ही गाणी सदर केली. जेम्सचे बॉलीवूडमधील शेवटचे गाणे 'वार्निंग ३ डी' मधील 'बेबसी' हे होते.

वाय्याक्तिक जीवन

[संपादन]

जेम्सचा पहिला विवाह रोठी हिच्याशी होता. २००२ साली त्याने पहिले लग्न तोडून बेनाझीर सझ्झाद हिच्याशी लग्न केले, जिला तो १९९९ मध्ये निऊ यॉर्क मध्ये एका संगीत कार्यक्रमात भेटला होता. बेनाझीरचे वय १८ च्या खाली असल्यामुळे तिच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर जेम्सला अटक करण्यात आली.[]

जेम्सला २ मुली; जन्नत व जाहान, व एक मुलगा; दानिश, आहे.

डिस्कोग्राफी (संगीत प्रकाशाने)

[संपादन]

गटांसोबत अल्बम

[संपादन]

फिलिंग्स

[संपादन]
  • फिलिंग्स (१९८७) (नंतर स्टेशन रोड ह्या नावात पुनर्नामांकन झालेले)
  • जेल ठेके बोलछी (१९९३)
  • नगर बओल (१९९६)
  • लाईस फीता लाईस (१९९८)

नगर बओल

[संपादन]
  • दुस्तु चेलेर दोल (२००१)

सोलो (स्वतःचा) अल्बम व गाणी

[संपादन]
  • अनोंना (१९८९)
  • पलाबे कोठाई (१९९५)
  • दुक्खिनी दुक्खो कोरोना (१९९७)
  • ठीक अच्छे बोन्धू (१९९९)
  • आमी तोमादोर ए लोक (२००३)
  • जोनोता एक्स्प्रेस (२००५)
  • तुफान (२००७)
  • काल जोमुना (२००८)
  • भिगी भिगी (२००५, 'गॅंगस्टर')
  • चाल चले (२००६, 'वो लम्हे')
  • रिश्ते, अलविदा (रिप्राइज) (२००७, 'लाईफ इन ए मेट्रो')
  • "बेबसी" (२०१३, 'वॉर्निंग ३ डी')

संदर्भ

[संपादन]
  1. ^ IMDb Mini Biography. imdb.com. Retrieved on 14-02-2017.
  2. ^ a b [१] Even people in villages relate to my music : James
  3. ^ [२] Archived 2017-08-05 at the Wayback Machine. James to attend ctg winterfest concert
  4. ^ [३] Nogor Baul James
  5. ^ [४] James and Nogor Baul live in New Zealand
  6. ^ [५] Archived 2019-08-20 at the Wayback Machine. James and Nagar Baul live in Concert
  7. ^ "संग्रहित प्रत". 2015-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-27 रोजी पाहिले.
  8. ^ [६] Archived 2015-06-11 at the Wayback Machine. Archive : Wild horses of music conviction
  9. ^ [७] Bangladeshi pop singer arrested