Jump to content

लॉर्ड डलहौसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेम्स ब्राउन-रामसे, डलहौसीचा पहिला मार्क्स या पानावरून पुनर्निर्देशित)
जेम्स ब्रुमन रॅमसे
गव्हर्नर जनरल
लॉर्ड डलहौसी
गव्हर्नर जनरलचा ध्वज
इस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह
अधिकारकाळ १८४८-१८५६
राजधानी कलकत्ता
जन्म २२ एप्रिल १८१२
डलहौसी कॅसल, मिडल्टन, ब्रिटन
मृत्यू १९ डिसेंबर १८६०
युनायटेड किंग्डम
वडील जॉर्ज रॅमसे
आई ख्रिस्तियाना नी ब्राउन
पत्नी सुसान
राजगीत राणीचे स्तुती गीत
चलन ब्रिटिश पाउंड
मागील:
लॉर्ड हार्डिंग
भारताचे गव्हर्नर जनरल
इ.स. १८४८इ.स. १८५६
पुढील:
लॉर्ड कॅनिंग


जेम्स अँड्र्यू ब्राउन-रामसे तथा लॉर्ड डलहौसी (२२ एप्रिल १८१२ - १९ डिसेंबर १८६०); १८३८ ते १८४९ दरम्यान द अर्ल ऑफ डलहौसी म्हणून ओळखला जातो, हा ब्रिटिश भारतातील एक स्कॉटिश राजकारणी आणि प्रशासक होता. १८४८ ते १८५६ पर्यंत त्याने भारताचा गव्हर्नर-जनरल म्हणून काम केले.

उच्च शिक्षणाबरोबरच मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांना शिक्षण सुरू करून त्याने भारतातील आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा पाया रचला. त्याने रेल्वेच्या प्रवासी गाड्या, इलेक्ट्रिक टेलीग्राफ आणि एकसमान टपाल व्यवस्था सुरू करून दिली, ज्याचे वर्णन तो "सामाजिक सुधारणेचे तीन महान इंजिन" करायचा. त्याने भारतात सार्वजनिक बांधकाम विभागाची देखील स्थापना केली. [] त्याच्या समर्थकांसाठी तो दूरदृष्टी असलेला गव्हर्नर-जनरल आहे, ज्याने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची राजवट मजबूत केली आणि प्रशासनाचा पाया घातला. त्याच्या ठोस धोरणांमुळे त्याचे उत्तराधिकारी बंडखोरीची लाट रोखू शकले. []

त्याच्याच काळात वूडचा खलिता आला ज्याला आपण भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हणतो.

त्याचा भारतातील शासनाचा काळ भारतीय प्रशासनाच्या व्हिक्टोरियन राज कालावधीत परिवर्तन होण्यापूर्वीचा होता. त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी ब्रिटनमधील अनेकांनी त्याचा निषेध केला कारण १८५७ च्या उठावाची चिन्हे लक्षात घेण्यात तो अयशस्वी झाला होता. तसेच त्याचा अतिआत्मविश्वास, केंद्रीकरण क्रियाकलाप आणि विस्तारित संलग्नीकरणामुळे उठावाचे संकट जास्त वाढले.

कारकीर्द

[संपादन]

इ.स. १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रजी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानिक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत. या मुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने याना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली. त्यातील प्रमुख कारण असे ते दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथावा संस्थानिक निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदू धर्मशात्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसवण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती होती. यास व्यपगत सिद्धांत/डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स असे म्हणतात. याने भारतातील अनेक संस्थाने खालसा केली.[].लॉर्ड डलहौसी व्हाईसरॉय असताना भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले[].

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Ghosh, Suresh Chandra (1978). "The Utilitarianism of Dalhousie and the Material Improvement of India". Modern Asian Studies. 12 (1): 97–110. doi:10.1017/S0026749X00008167. JSTOR 311824.
  2. ^ साचा:Cite EB1911
  3. ^ http://www.britannica.com/EBchecked/topic/330400/doctrine-of-lapse
  4. ^ http://www.apta.com.au/SubMenu/Brief_Postal_History_of_India.aspx?id=114