जी.एम.सी. बालयोगी
गंटी मोहनचंद्र बालयोगी (रोमन: Ganti Mohana Chandra Balayogi) (ऑक्टोबर १, इ.स. १९४५ - मार्च ३, इ.स. २००२) हे भारतीय राजकारणी व वकील होते. बालयोगी लोकसभेचे तेरावे अध्यक्ष होते.
जीवन
[संपादन]त्यांचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. स्वतःच्या कर्तृत्वावर ते सार्वजनिक जीवनात पुढे आले. सर्वप्रथम ते इ.स. १९९१ मध्ये तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून अमलापुरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.इ.स. १९९६ मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री म्हणून काही महिने काम बघितले. इ.स. १९९८ मध्ये ते परत लोकसभेवर निवडून गेले. भारतीय जनता पक्ष आणि तेलुगु देसम पक्षांदरम्यान झालेल्या वाटाघाटींप्रमाणे त्यांचे नाव लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले.त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. एप्रिल १७, इ.स. १९९९ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान ओरीसाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गामांग यांना मुख्यमंत्रीपदी असतानाही लोकसभेचे सदस्य म्हणून सभागृहात मतदान करायचा अधिकार आहे का, हा प्रश्न मोठ्या कौशल्याने हाताळला. १९९९ मध्ये ते तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि ऑक्टोबर २२, इ.स. १९९९ रोजी त्यांची परत एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मार्च ३, इ.स. २००२ रोजी त्यांचे पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काईकालूर या ठिकाणी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
बाह्य दुवे
[संपादन]मागील: पी.ए.संगमा |
लोकसभेचे अध्यक्ष मार्च २४, इ.स. १९४५ – मार्च ३,इ.स. २००२ |
पुढील: मनोहर जोशी |