जीवाश्मशास्त्र
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
जीवाश्मशास्त्र' या शास्त्रात प्रागैतिहासिक जिवांची उत्पत्ती व पर्यावरणाशी जुळवून घेताना झालेली त्याची उत्क्रांती, यांचा प्रामुख्याने जीवाश्मांच्या मदतीने अभ्यास केला जातो. विद्याशाखीय दृष्टिकोनातून जीवाश्मशास्त्र ही जीवशास्त्र व भूशास्त्र यांच्याशी संबंधित आंतरविद्या आहे. जीवाश्म विखुरलेले असतात. जीवाश्मांना एकत्रित करून कल्पनेच्या साहाय्याने प्राण्यांच्या शरीराचा आकार, खाद्यसवयी तसेच पुनरुत्पादन प्रक्रिया इत्यादी विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न जीवाश्मशास्त्रज्ञ करीत असतात. या शास्त्राच्या अभ्यासामुळे, डायनॉसॉर जातीमधील अतिभव्य प्राणी पृथ्वीवरून नष्ट होण्याची कारणे कोणती याचा मागोवा घेण्यास खूप मदत झालेली आहे. आदिमानव कसा उत्क्रांत होत गेला याचाही खुलासा करण्याचा प्रयत्न या शास्त्राने केला आहे.
जीवाष्माला इंग्रजी भाषेमध्ये Fossil असे संबोधले जाते. Fossil हा शब्द लाटिन भाषेतील fossus म्हणजे खोदणे ह्या शब्दावरून निर्माण झाला आहे. फार फार पूर्वी होऊन गेलेल्या सजीवांचे अवशेष निसर्गतः जतन झाले आणि त्याचा अभ्यास करून त्यावेळी असलेली परिस्थिती त्या वेळचे जीवन, वातावरण इत्यादीचा अंदाज बधला गेला. सजीवांचे अश्मीभवन होण्याची क्रिया तशी अगदी विरळीच म्हणावी लागेल, कारण मृत्युनंतर सर्व सजीवांचे अवशेष सर्वसाधारणपणे, निसर्गतः विघटन होऊन नष्ट होतात आणि कुठलेही अवशेष शिल्लक रहात नाहीत. सजीवांचे अश्मिभवन होण्यासाठी काही विशिष्ठ परिस्थितीची आवश्यकता असते, एकतर सजीवाचे अवशेष लवकर साक्यामध्ये (Sediment ) बद्ध झाले पाहिजेत, याला अपवाद सुद्धा आहे. जर सजीव खूप थंडीमुळे बर्फात गाडला गेला तर, तो वाळून सुकून गेला तर, किंवा तो प्राणवायू विरहित वातावरणात अडकला तर असा सजीव निसर्गतः जतन होतो. अश्मिभवन वेगवेगळ्या प्रकारे होत असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |