जीवक
Appearance
जीवक कौमारभच्च हे प्राचीन भारतातील एक आयुर्वेदाचार्य होते. अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. ते बालरोगतज्ज्ञ असून गौतम बुद्धांचे खासगी वैद्य होते.
जीवक कौमारभच्चांचा जन्म बिंबिसार राजाच्या कारकिर्दीत मगध देशाच्या राजधानीत (सध्याचे राजगीर) झाला. त्यांची आई एक गणिका होती. लोकलाजेस्तव आईने त्यांनी ते तान्हे असतानाच एका कचऱ्याच्या ढिगावर फेकून दिले. बिंबिसारचा मुलगा अभय याला हे समजले. त्यांनी जीवकाला घरी आणून त्याच्या पालन पोषणाची व्यवस्था केली व उच्च शिक्षणासाठी त्याला तक्षशिला विश्वविद्यालयात पाठवले. तेथे अत्रेयांच्या हाताखाली सात वर्षे अभ्यास करून जीवक आयुर्वेदाचार्य बनले.
जीवकाबद्दलची पुस्तके
[संपादन]- जीवक एक बाल अश्विनीकुमार (कादंबरी, मूळ हिंदी, लेखिका मालविका कपूर; मराठी अनुवाद - डॉ. अंजली पटवर्धन-कुलकर्णी) (विश्वकर्मा प्रकाशन)