जाळे (वाडा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जाळे, पालघर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?जाळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .१९८८१ चौ. किमी
जवळचे शहर वाडा
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
५८२ (२०११)
• २,९२७/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२१३०३
• +०२५२६
• एमएच/४८ /०४ /०५

जाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर तोरणे इस्पात उद्योग कंपनी नंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२९ कुटुंबे राहतात. एकूण ५८२ लोकसंख्येपैकी २८४ पुरुष तर २९८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६३.२१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६९.४० आहे तर स्त्री साक्षरता ५७.२६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १०९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.७३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

देवगाव, झाडखैरे, म्हासवळ, बेरशेती, वारनोळ, खैरेआंबिवळी, तोरणाई, चेंदवळी, कुयाळु, कुडुस, वाडा ही जवळपासची गावे आहेत.खैरेआंबिवळी ग्रामपंचायतीमध्ये बेरशेती, जाळे, खैरेआंबिवळी, वारनोळ, झाडखैरे ही गावे येतात.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/