Jump to content

व्ही.एन. जानकी रामचंद्रन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जानकी रामचंद्रन या पानावरून पुनर्निर्देशित)
वैकोम नारायणी जानकी

तमिळनाडूचे मुख्यमंत्री
कार्यकाळ
७ जानेवारी, १९८८ - ३० जानेवारी, १९८८
कार्यकाळ
७ जानेवारी, १९८८ – ३० जानेवारी, १९८८
राज्यपाल सुंदरलाल खुराना
मागील एम.जी. रामचंद्रन
पुढील राष्ट्रपती राजवट
मतदारसंघ नाही

जन्म ३० नोव्हेंबर, १९२३ (1923-11-30)[]
मृत्यू १९ मे, १९९६ (वय ७२)[]

वैकोम नारायणी जानकी, जानकी रामचंद्रन तथा जानकी एम.जी.आर. (३० नोव्हेंबर, १९२३:वैकोम, त्रावणकोर संस्थान, ब्रिटिश भारत  – १९ मे, १९९६:चेन्नई,तमिळनाडू, भारत )[] या एकभारतीय अभिनेत्री आणि राजकारणी होत्या. यांनी मुख्यत्वे मलयालम आणि तमिळ चित्रपटातून काम केले. आपले पती एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर जानकी २३ दिवस तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. भारताच्या इतिहासात मुख्यमंत्री झालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.

जानकी यांचा जन्म त्रावणकोरच्या [] कोट्टायम जिल्ह्यातील वैकोम गावात झाला. त्यांच्या कुटुंबाचे मूळ तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही प्रदेशांत होते. यांचे वडील, राजगोपाल अय्यर, तामिळनाडूतील तंजावर येथील तमिळ ब्राह्मण होते. हे संगीतकार पापनासम शिवन यांचे भाऊ होते. [] यांची आई नारायणी अम्मा वैकोमची होती. जानकी यांच्या आईवडीलांचे लग्न नव्हते झाले तर त्यांच्यात संबंधम नाते होते. त्यामुळे जानकी (''वैकोम नारायणी जानकी'') आणि त्यांची भावंडे आईच्या नावाने ओळखली जायची.

जानकीनेही वयाच्या १७व्या वर्षी अभिनेते गणपति भट (१९१५-७२) या ब्राह्मण गृहस्थांशी तिच्या आई-वडिलांप्रमाणेच संबंधम लग्न केले. जानकी आणि गणपती भट यांना सुरेंद्रन नावाचा मुलगा होता. []

चित्रपट कारकीर्द

[संपादन]

जानकी यांनी मन्मथा विजयम (१९३९) [] आणि सावित्री (१९४१) हे होते. १९४८मधील चंद्रलेखाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. []

जानकीने एम.जी. रामचंद्रन यांच्यासोबत राजा मुक्ती आणि मोहिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी १९६० पर्यंत आपली चित्रपट कारकीर्द थांबवली होते. रामचंद्रनच्या दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर जानकी त्यांच्यासोबत रहायला लागली. [] त्यांनी १९६२ मध्ये कायदेशीर विवाह केला. रामचंद्रन आणि जानकी यांनी जानकीच्या पहिल्या लग्नापासूनच्या मुलाला सांभाळले. []

राजकीय कारकीर्द

[संपादन]

जानकी सुरुवातीस राजकीयदृष्ट्या सक्रिय नव्हत्या. [] रामचंद्रन यांनी अभिनेत्री जयललिता यांचासह त्यांच्या पक्षातील इतर तरुण नेत्यांना राजकीय जबाबदारीसाठी तयार केले होते.

१९८४मध्ये रामचंद्रन यांना पक्षाघाताचा झटका आल्यावर जानकी रामंचंद्रन आणि पक्षात मध्यस्थ झाल्या. १९८७मध्ये रामचंद्रनच्या निधनानंतर पक्षाच्या सदस्यांनी जानकी यांना त्यांची जागा घेण्यास सांगितले. []

मुख्यमंत्री

[संपादन]

मुख्यमंत्रीपद घेतल्यावर जानकी यांनी जानेवारी १९८८ मध्ये तामिळनाडूच्या आठव्या विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावेळी १९४ आमदारांची एआयडीएमके ३ गटात विभागली गेली होती. ३० आमदारांचा एक गट जयललिता यांना पाठिंबा देत होता तर १०१ आमदारांचा दुसरा गट जानकीला पाठिंबा देत होता. काँग्रेस पक्षाने आपले राष्ट्रीय अध्यक्ष आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निर्देशानुसार तटस्थ मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. विरोधकांनी विधानसभेत मतदानाच्या दिवशी गुप्त मतदानाची मागणी केली. मात्र जानकीला पाठिंबा देणाऱ्या सभापतींने ती फेटाळून लावले. त्यांनी आदल्याच दिवशी जयललिता गटाच्या ३० आणि द्रमुकच्या १५ आमदारांना अपात्र ठरवले होते. मतदानाच्या वेळी विधानसभेत उपस्थित असलेल्या आमदारांचा पाठिंबा पुरेसा असल्याचेही त्यांनी फर्मान काढले होते. त्यामुळे २३४ आमदारांतून बहुमत न घेता जानकी यांच्या सरकारला फक्त १९८ आमदारांकडून बहुमत घ्यायचे होते. त्यांना १०१ मते पडली. सभापतींनी मतदान सुरू केल्यावर द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या आमदारांमध्ये विधानसभेच्या सभागृहातच हाणामारी झाली आणि सभापतींसह अनेक जण जखमी झाले. सभापतींच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर सभापतींनी जानकी यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे एकतर्फी जाहीर केले. []

राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये त्यांचे सरकार बरखास्त करण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम ३५६ चा वापर केला. त्यानंतर १९८९ मध्ये झालेल्या पुढील निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. एआयएडीएमकेच्या दोन गटांच्या एकत्रीकरणानंतर तिने राजकारण सोडले. [] जानकी या काही मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत ज्यांनी विधानसभेची कोणतीही निवडणूक जिंकलेली नाही. []

मृत्यू

[संपादन]

१९ मे १९९६ रोजी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . रामापुरम, चेन्नई, तामिळनाडू येथील एमजीआर थोट्टम येथे तिच्या राहत्या घराशेजारी तिला दफन करण्यात आले.

मोहिनीमध्ये एमजीआरसोबत जानकी (१९४८)

नोंदी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Janaki Ramachandran, the first woman chief minister of Tamil Nadu who ruled for 24 days". ThePrint. 19 May 2020.
  2. ^ a b c "Leading lady". S.H. Venkatramani. 31 January 1988. 18 September 2017 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "indtoday" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ a b c "The 'leading' lady". Vincent DSouza. 10 January 1988. 2 June 2018 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "week" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  4. ^ a b Guy, Randor (30 July 2016). "Thyagi (1947)". The Hindu. 2 June 2018 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "thyagi" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  5. ^ Subramani, A (4 July 2012). "M G Ramachandran autobiography copyright belongs to Janaki son, rules HC". द टाइम्स ऑफ इंडिया. 21 September 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Janaki's son alone has copyright to MGR's autobiography: court". The Hindu. 4 July 2012. 6 December 2016 रोजी पाहिले.
  7. ^ TAMIL NADU LEGISLATIVE ASSEMBLY (EIGHTH ASSEMBLY) REVIEW 1985-88, Chennai
  8. ^ "Jayalalitha Childhood Photos: MGR : Unbelievable Facts PART1". 5 January 2020 रोजी पाहिले.
  9. ^ the first woman chief minister of Tamil Nadu who ruled for 24 days, Janaki Ramachandran (19 May 2020). "Janaki Ramachandran, the first woman chief minister of Tamil Nadu who ruled for 24 days". ThePrint. 24 May 2021 रोजी पाहिले.