चे गेवारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चे गेवारा

चे गेवारा
जन्म अर्नेस्तो गेवारा
१४ जून, इ.स. १९२८
रोझारियो, सांता फे, आर्जेन्टिना
मृत्यू ९ ऑक्टॉबर, इ.स. १९६७ (वय ३९)
ला हिगुएरा, वायेग्रांदे, बोलिव्हिया
मृत्यूचे कारण मृत्युदंड
चिरविश्रांतिस्थान चे गेवारा माउसोलियम, सांता क्लारा, क्युबा

अर्नेस्तो "चे" गेवारा (स्पॅनिश: Ernesto Che Guevara), ऊर्फ चे गेवारा किंवा एल चे किंवा चे, (जून १४, इ.स. १९२८ - ऑक्टोबर ९, इ.स. १९६७) हा आर्जेंटिनाचा मार्क्सवादी क्रांतिकारक, वैद्य, लेखक, गनिमी लढवय्यांचा म्होरक्या, राजकीय नेता आणि लष्कर तज्ञ होता. तो क्युबन क्रांतीमधील एक प्रमुख व्यक्ती होता.

वैद्यकीय शिक्षण घेत असताना चेने लॅटिन अमेरिकेचे भ्रमण केले. त्यादरम्यान त्याला गरीबी व एलियनेशनचे विदारक दृष्य आढळले, ज्यामुळे त्याचे मतपरिवर्तन झाले. त्याचे अनुभव व निरिक्षणांद्वारे तो ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचला की "लॅटिन अमेरिकन प्रदेशात रुजलेली आर्थिक विषमता ही भांडवलशाही, एकाधिकारशाही, नव-वसाहतवादसाम्राज्यवाद ह्या आंतरिक घटकांचा परिणाम आहे, ज्यावर एकमात्र उपाय म्हणजे जागतिक क्रांती आहे." ह्या विचारांनी त्याला ग्वातेमालाच्या सामाजिक पुनर्रचनेमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले. हे पुनर्रचनेचे कार्य ग्वातेमालाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॅकोबो आर्बेंझ ह्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.