Jump to content

चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हे भारत सरकारच्या १९५२ सालच्या सिनेमॅटोग्राफ कायद्याने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांनुसार काम करणारे मंडळ आहे. भारतात करावयाच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी चित्रपटाची पात्रता तपासून जरूर पडल्यास चित्रित केलेया दृश्यांची किंवा संवादांची काटछाट करून त्यांत सुधारणा सुचवण्याचे काम हे मंडळ करते. त्यानंतर त्या चित्रपटाला "U", "A" किंवा "AU" यांपैकी एक दाखला मिळतो. "U" म्हणजे सर्व जनतेला दाखवण्यास मुभा असलेला, "A" म्हणजे फक्त प्रौढांसाठी आणि "U/A" म्हणजे वडीलधाऱ्या मंडळीसमवेत लहान मुलांनाही पाहता येईल, असे हे तीन प्रकारचे दाखले असतात. देशाचे सार्वभौमत्व, देशाची आदरणीय प्रतीके, इतर देशांशी संबंध व अशा काही गोष्टींच्या रक्षणार्थ, तसेच समाजविघातक गोष्टीं समाजासमोर येऊ नयेत, यांसाठी या काटछाटी केल्या जातात.

रंगभूमीवर येऊ पाहणारी नाटके, इतर करमणुकीचे कार्यक्रम आणि छापायच्या लेखी मजकुरांचे परिनिरीक्षण करण्यासाठी अशीच मंडळे (सेन्सॉर बोर्डे) असतात. परिनिरीक्षण मंडळाच्या पॅनेलवर समाजातील विविध वर्गांतील व व्यवसायांतील प्रतिष्ठित व्यक्तींना नेमले जाते.

परिनिरीक्षण मंडळाने सुचवलेल्या काटछाटी अनेकदा विवादास्पद असू शकतात. अशा काटछाटींविरुद्ध मंडळाच्या वरिष्ठ बोर्डाकडे अपील करता येते. त्याच्याकडूनही समाधान झाले नाही तर उच्च न्यायालयाकडे दाद मागता येते.

चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे आजवरचे अध्यक्ष

[संपादन]
  • अनुपम खेर (१६ आॅक्टोबर २००३ ते १३ आॅक्टोबर २००४)
  • अपर्णा मोहिले (११ आॅगस्ट १९८२ ते १४ मार्च १९८३)
  • आशा पारेख (२५ जून १९९८ ते २५ सप्टेंबर २००१)
  • पहलाज निहलानी (१९ जानेवारी २०१५ ते ११ आॅगस्ट २०१७)
  • प्रसून जोशी (१२ आॅगस्ट २०१८पासून)
  • मोरेश्वर वनमाळी (२० फेब्रुवारी १९८९ ते २५ एप्रिल १९९०)
  • लीला सॅमसन (१ एप्रिल २०११ ते १६ जानेवारी २०१५)
  • विजय आनंद (२६ सप्टेंबर २००१ ते १९ जुलै २००२)
  • शक्ती सामंत (१ एप्रिल १९९१ ते २५ जून १९९८)
  • शरद उपासनी (१५ मार्च १९८३ ते ९ मे १९८३)
  • शर्मिला टागोर (१३ आॅक्टोबर २००४ ते ३१ मार्च २०११)
  • हृषीकेश मुखर्जी (१ फेब्रुवारी १९८१ ते १० आॅगस्ट १९८२)

अपर्णा मोहिले यांची पुस्तके

[संपादन]
  • शब्दपुष्पांजली (कवितासंग्रह)
  • संसार आणि सेन्साॅर
  • सेन्सॉर जीवनसार आणि मी



(अपूर्ण)