चारोळी (सुकामेवा)
Appearance
चारोळी हे एक प्रकारचे बी आहे. हा एक सुकामेवा असून याचा वापर मुख्यत: दुधाच्या मिठाईत व शक्तिवर्धक अन्नऔषधीत करतात. हे बी चार नावाच्या वनस्पती पासून मिळवले जाते.
अन्नघटक व प्रमाण
[संपादन]चारोळीत १७ % कार्बोहायड्रेट्स, २२ % प्रोटीन्स, ४४ % फॅट्स (तेल), १२ % पिष्टमय पदार्थ, व ५ % साखर असते.
चारोळीच्या 'बी'चे उपयोग
[संपादन]चारोळीचा वापर मुख्यत्वे बासुंदी, आईस्क्रीम, पेढे, बर्फी, श्रीखंड, खीर व इतर मिठाईच्या पदार्थांत करतात. काजू + बदाम + खारीक + गोडंबी + चारोळी + खडीसाखर यांचे मिश्रण करून पौष्टिक सुकामेवा तयार करतात. झाडाच्या सालीपासून डिंक व टॅनिन मिळते. चारोळीच्या पानांपासून गुरांना चारा उपलब्ध होतो. चारोळीच्या 'बी'पासून तेल निघते. त्या तेलामुळे केस काळे होतात.