बासुंदी
सीताफळ बासुंदी | |||||||
प्रकार | मिष्टान्न | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|
जेवणातील कोर्स | जेवन करताना | ||||||
उगम | भारत | ||||||
प्रदेश किंवा राज्य | महाराष्ट्र | ||||||
अन्न बनवायला लागणारा वेळ | 20 मिनिटे ते 30 मिनिटे | ||||||
अन्न वाढण्याचे तापमान | गरम किंवा थंडगार | ||||||
मुख्य घटक | दूध, साखर, चारोळी | ||||||
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य | विलायची, केसर | ||||||
भिन्नता | सिताफळाचा गर मिसळून | ||||||
अन्नाद्वारे प्राप्त ऊर्जा (प्रती 1 कप द्वारे) | 400 किलो कॅलरी (1675 किलो जुल)myfitnesspal | ||||||
पौष्टिक मूल्य (प्रती 1 कप द्वारे) |
| ||||||
तत्सम पदार्थ | रबडी | ||||||
बासुंदी हे दूध व साखरेपासून बनवले जाणारे एक मिष्टान्न आहे.[१] मलईयुक्त दुधास मंद आंचेवर लोखंडी कढईत तापवून व आटवून, त्यात साखर घालून हा पदार्थ तयार केला जातो.[२]
प्रकार
[संपादन]उत्तर भारतात घट्ट बासुंदीला रबडी असे म्हणतात. कुरुंदवाड तसेच नृसिंहवाडी येथील बासुंदी सुप्रसिद्ध असून तिला पुणे, मुंबई इथून मोठ्या प्रमाणात मागणी असते.[३] या गावातील बासुंदीचे वैशिष्ट्य म्हणजे साखर न घातलेली बासुंदी येथे मिळते. लातूर जिल्ह्यातील उजनी, सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे ही गावे सुद्धा बासुंदीसाठी प्रसिद्ध आहेत. हल्ली बासुंदीमध्ये सीताफळाचा गर मिसळून सीताफळ बासुंदी केली जाते.
प्रक्रिया
[संपादन]उकळण्याच्या प्रक्रियेदरम्यान लवकर घट्ट होण्यासाठी यात दूधपावडर, सिताफळाचा गर किंवा क्रीम घातले जाते. बासुंदी आटत आल्यावर थोडी साखर, वेलची, चारोळी आणि / किंवा केशर घालावे. साखर घातल्यानंतर बासुंदी दीर्घकाळ टिकते. दूध आटत असताना साखर घातल्यास बासुंदीला गुलाबी रंग मिळतो. साखर घातल्यावर बासुंदी थोडी पातळ होते. बासुंदीत थोडेसे केशर घालण्याने केशरी रंग येतो. बासुंदी वाढण्यापूर्वी त्यात बदाम आणि पिस्ताचे तुकडे घालून रुची वाढविता येते.
संदर्भ
[संपादन]- ^ "From basundi to sheera, 5 Gujarati dessert recipes to try". Condé Nast Traveller India (इंग्रजी भाषेत). 2020-07-22. 2021-05-27 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra's Puri Basundi Recipe: Is It A Dessert Or A Snack? Eat, Relish And Decide!". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-14 रोजी पाहिले.
- ^ "तुमच्याही तोंडाला पाणी सोडेल ही बासुंदी; पुणे, मुंबईकरांना पडते भुरळ". eSakal - Marathi Newspaper. 2021-05-14 रोजी पाहिले.