श्रीखंड
Jump to navigation
Jump to search
श्रीखंड हा दुधापासून बनणारा खास मराठी-गुजराती गोड खाद्यपदार्थ आहे. अतिशय साध्या रूपात श्रीखंड म्हणजे चक्का आणि साखरेचे मिश्रण म्हणता येईल. या मिश्रणात अधिक चवीसाठी सामान्यतः बदाम-पिस्ता, काजू, केशर, वेलदोडा, आंब्याचा रस(आमरस) इ. पदार्थ मिसळले जातात.'आमरस' मिळवला असता या पदार्थास 'आम्रखंड' असे म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.
इतर माहिती[संपादन]
हा महाभारतकालीन खाद्यपदार्थ असून तेव्हा त्यास 'शिकरणी' या नावाने ओळखले जायचे. जुन्या काळी ८ प्रकारच्या शिकरणी बनत असत असा उल्लेख सापडतो.[ संदर्भ हवा ]
बाह्य दुवे[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |