चर्चा:हरिशंकर परसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखातले प्रत्येक परिच्छेदानंतरचे 'संदर्भ' द्या असे आदेश पहा. तसे न केल्यास लेखाची उललेखनीयता सिद्ध होणार नाही, असे म्हटले आहे.

याच विकीवराचा पु.ल. देशपांडे हा लेख पाहा. या लेखातही परिच्छेदा-परिच्छेदाला असेच संदर्भ मागावेत, त्याशिवाय त्या लेखाची उल्लेखनीयता कशी सिद्ध होईल?. .... (चर्चा) १३:५८, ६ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svg: आपण विश्वकोशात लिहीण्याबद्दल बोलत आहोत याची मला तुम्हांला आठवण करुन द्यावीशी वाटतीये, त्यामुळे पु.ल्.देशपांडे या लेखालाही तोच न्याय लागू होतो जो इतर कोणालाही लागू होतो आहे. आणि आपण किती विश्वकोशीय योगदान दिले आहे ते आपल्या नकल-डकव नितीवरून(नकल-डकव म्हणून अधोरेखीत केलेला मजकूर न बदलल्यास तो काढून टाकला जातो हे सर्व विकीवरील वास्तव आहे!) लक्षात येत आहे. इतके दिवस संदर्भ देणे अवघड होते म्हणून संदर्भाविना लिहीलेले चालून गेले आता संदर्भ देणे इतके सोपे असूनही विश्वकोशाचे मजकूर संदर्भविना राहातील हे शक्य नाही. आणि उल्लेखनीयतेचा मुद्दा संदर्भ आणि विश्वकोशीय पारिभाषीक पध्दतीने लिहिल्याशिवाय सुटत नाही, त्यामुळे आपण अशी इच्छा करत असाल की आपण लिहिलेले टिकून रहावे तर आपल्याला संदर्भ आणि विश्वकोशाचे नियम पाळावे लागतात, मराठी विकी त्याला अपवाद असु शकत नाही. संदर्भ द्या ही धमकी नसून कुठल्याही विद्यापीठीय आणि विश्वकोशीय लिखाणाची मुलभूत गरज आहे. आपल्यासारख्या सुजाण व्यक्तीला मला हे सांगावे लागत आहे ह्यासारखे मराठी समुदायाचे दुर्दव नाही. आपण संदर्भासाठी सायटोईड आणि इतर नविन अवजारे वापरुन वैध संदर्भासहित लिखाण कराल अशी आशा! तेव्हा चला काम करुयात आणि भांडण्ं आणि आकस धरुन एकमेकांना हिणवणं बंद करुयात.WikiSuresh (चर्चा) ०५:४६, ८ एप्रिल २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgSureshkhole:

मी शंभर टक्के नकल-डकव (हा मीच बनविलेला शब्द!) करून एकही लेख लिहिल्याचे मला आठवत नाही. लेख लिहिण्यासाठी मी माझ्या, माझ्या वाडवडिलांच्या आणि नातेवाइकांच्या नॊंदवह्यांची मदत घेत असतो. सुदैवाने माझा अनेक विद्वानांशी परिचय आहे. मला लेखनात कोणतीही शंका आली की मला त्यांचा सल्ला मला सहज उपलब्ध असतो. माझा जुन्या ग्रंथांचा संग्रहही दांडगा आहे. शिवाय मी तीन ग्रंथ संग्रहालयांचा सदस्य आहे, आणि इतरही वाचनालयांतून माझा मुक्त संचार असतो.

मी लेखात लिहिलेली माहिती अनेक ठिकाणांहून जमा केलेली असते. तिच्यातला खरेपणा पाहूनच तिचा लेखात अंतर्भाव होतो.

'सूर्य' या लेखात संदर्भ मागून पहावे.
सूर्य हा एक तप्त गोळा आहे (कशावरून तो गोळा आहे आणि कशावरून तो तप्त आहे? संदर्भासहित सिद्ध करावे) त्यापासून पृथ्वीला सूर्यप्रकाश मिळतो. (हा सूर्यप्रकाश सत्य आहे की भ्रम?) (सूर्यप्रकाशाहून दुसरे काय सत्य आहे त्याचे संदर्भ द्यावेत.)

पु'.ल. देशपांडे नावाचा एक माणूस होता (नक्की?) त्याची जन्मतारीख अमुक अमुक होती. (संदर्भासाठी ग्रामपंचायतीच्या नॊंदवह्या सादर कराव्यात.) त्याने बरीच पुस्तके लिहिली. - हे लिहिणाऱ्याचे ठाम मत असल्यास तसे शपथपत्र करावे आणि किमान तीन वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करून त्यानंतर कोर्टात सादर करावे.करावे. कोर्ट ते बहुधा मान्य करेल, पण एक अट घालेल. पुढील ३०० वर्षात जर या शपथपत्रांत उल्लेखिलेल्या माहितीखेरीज वेगळी माहिती समोर आली तर कोर्टाने दिलेली ही मान्यता रद्द होईल. (दादोजी कोंडदेवांबद्ल असेच झाले!)

याहून अधिक काय लिहावे? सुज्ञांस अधिक सांगणे नलगे .... (चर्चा) १४:५४, ८ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svg: मी प्रताधीकार भंग साच्यामध्ये दुवे दिलेले आहेत जिथुन हा मजकूर नकल डकव केलेला आहे, त्यामुळे त्या दुव्यांवर जाऊन जे वास्तव आहे ते तुम्ही स्पष्ट पाहू शकता. आपण सुरु केलेले अनेक लेख हे सुरुवातीच्या आपल्याच आवृत्तीला जरी ह्या प्रमाणे जसे मी कमल देसाई हा लेख पाहिला तरी त्यात मोठ्या प्रमाणावर नकल-डकव केलेला मजकूर जसाच्या तसा आहे. आता ह्याचा अर्थ खालील बाबी असू शकतात की,

  1. आपल्या वाडवडिलांच्या नोंदवह्यांमध्येच तो मजकूर काही दशके आधी लिहीला असेल जो नंतर २२ फ़ेब्रू २०१८ रोजी लोकसत्ता मध्ये आला होता आणि त्याच दिवशी रात्री तुम्ही कमल देसाई हा लेख तयार केला आणि त्यात ७,००१ बाइट एवढा मजकूर तयार केल्याबरोबरच होता.
  2. किंवा तुमच्या वाडवडीलांच्या वह्या पाहूनच लोकसत्तावाले त्यांच्या बातम्या देत असावेत.
  3. किंवा तुमच्या विद्वान मित्रांपैंकीच कोणीतरी लोकसत्तात लिहीत असावेत ज्यांनी तुम्हांला ही माहिती आधीच दिली होती आणि तुम्ही ती जशीच्या तशी उतरवलीत.
  4. किंवा तुमच्या तथाकथित ग्रंथसंग्रहामधल्या कुठल्यातरी बाडामध्ये ही माहिती होती आणि तीच माहिती लोकसत्तात लेख लिहीणाऱ्याने वापरून लेख लिहीला आहे.
  5. किंवा तुम्हीच लोकसत्तामध्ये २२ फ़ेब्रू २०१८ ला सकाळी ३ वाजता आलेली बातमी पाहून तो लेख त्या बातमीच्या मजकूराची नकल-डकव करून त्याच दिवशी रात्री २०,१५ ला लिहीला आहे.

आता मला तरी सामान्य बुध्दीने शेवटी दिलेली शक्यता वास्तव वाटत आहे. आपल्याला ह्या बाबत मतभेद असल्यास आपण मला प्रत्येक लेखाला तसे साचे लावण्य़ास भाग पाडत आहात. ज्या मध्ये प्राताधिकार भंग झालेला मजकूर झाकला जातो आणि शेवटी काढून टाकला जातो. कमल देसाई प्रमाणेच मी आपले अनेक लेख दाखवू शकतो ज्यामध्ये भयंकर मोठ्याप्रमाणात नकल-डकव लेखाच्या सुरूवातीलाच आहे. त्यामुळे आपण नकल-डकव मोठ्याप्रमाणात केलेली आहे हे तुम्ही इथे मान्य कराल किंवा नाही त्यापेक्षा ते प्रत्यक्षात केलेले आहे हे स्पष्ट आम्हांला दिसत आहे. किंबहुना अनेक ठिकाणी दिसत आहे, तेव्हा आपण एकतर नकल-डकव केलेला मजकूर स्वत:हून काढून टाका किंवा तसे साचे लावून तो तसाही(लावलेल्या साच्यांकडे पाहून प्रचालक किंवा इतर सदस्य निर्णय घेतील) साफ़ केला जाईल. पण दुसऱ्या प्रकारे केल्या जाण्यामध्ये तुमचेच नुकसान आहे, कारण दुसऱ्या प्रकारे केलेली कारवाई शिस्तभंगाला दिलेल्या शिक्षेसारखी असेल. शिवाय मला हे कळत नाही कि, ग्रंथसंग्रह/विद्वान नातेवाईक/ग्रंथालयांवर वहिवाट एवढं असूनही तुमच्या लेखांन संदर्भांची वानवा का असते? Gnome-edit-redo.svgअभय नातू: आपण यापुढे ज च्या कारवायांवर प्रचालक म्हणून लक्ष द्यावे ही विनंती. कारण मला तरॊ हा संवाद, संवाद आहे असे वाटत नाहीये आणि संदर्भ किंवा कारण न देता पाने उलटवण्यात त्यांचा हात कुणीही धरु शकणार नाही असा त्यांचा इतिहास सांगतो. WikiSuresh (चर्चा) १९:०७, ८ एप्रिल २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgSureshkhole: कमल देसाई या जुन्या काळात इतक्या प्रसिद्ध बाई होत्या की त्यांच्याबद्दची माहिती जगजाहीर होती. लोकसत्ताच्या लेखकालाही ही माहिती असावी, ती त्याने उतरवून काढली, एवढेच. संदर्भ देऊन विकिपीडियावर माहिती देण्यापेक्षा मराठी विकिपीडियाचा संदर्भ देऊन इतर प्रसार माध्यमांत माहिती यावी यासाठी आपण काय करतो हा विचार महत्त्वाचा आहे. मी विकीवर लिहिलेले अनेक लेख अन्य संकेतस्थळांवर किंवा महाराष्ट्र टाइम्ससारख्या वृत्तपत्रांत आल्याची उदाहरणे आहेत. (दाखल्यादाखल मराठी विकीवरील दारासिंग हा लेख. हा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये मुळातल्या शुद्धलेखनांच्या चुकांसहित छापून आला होता. )

छापील मजकुराच्या प्रताधिकारासंबंदी मी मृदुला बेळे यांच्याशी संपर्क केला होता. त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या ध्यानात आले, की जोपर्यंत एका लेखकाने लिहिलेल्या मजकुराचा उपयोग दुसरा माणूस प्रचार, प्रसार, स्वार्थ किंवा आर्थिक फायदा यांसारख्या अंतस्थ हेतूसाठी करत नाही तोपर्यंत मूळ लेखक प्रताधिकारभंगाचा दावा करू शकत नाही. आपण वर्तमानपत्र वाचतो, दुसऱ्याला वाचून दाखवतो, त्यावर चर्चा करतो, मते व्यक्त करून ती त्याच वर्तमानपत्रात प्रसिद्ध करतो, यात कुठलाही प्रताधिकारभंग होत नाही. वर्तमानपत्रातील मजकूर हा सार्वजनिक वाचनासाठी आणि प्रसारासाठी मुक्त असतो. एखाद्या व्यक्तीच्या निधनाची बातमी छापून आली प्रताधिकारभंगाच्या भीतीने गुप्त ठेवायची नसते. .... (चर्चा) २१:१९, ८ एप्रिल २०१८ (IST)

वरील चर्चेत दोन्ही बाजूंनी ग्राह्य मुद्दे मांडले गेलेले आहेत. विस्ताराने माझे मत थोड्याच वेळात मांडत आहे.
तोपर्यंत दोघांनीही जरा सबूरीने घ्यावे व विकिपीडियाचे अझ्यूम गुड फेथ या तत्त्वाचे चिंतन/पालन करावे ही आग्रहाची विनंती.
अभय नातू (चर्चा) २३:५८, ९ एप्रिल २०१८ (IST)
नक्कीच मला वाटतयं साच्यांच काय करायचं ह्या चर्चेमधून हा प्रश्नही सुटेल कारण, अनेक बाबी तर कॉपीव्हायो अहवालाने स्पष्ट उघड केल्या आहेतच, शिवाय हा एकच लेख नसून असे अनेक लेख तत्सम "जाणत्या" ::सदस्यांचे सापडलेले आहेत, त्या सर्वांवरच आपल्याला हीच चर्चा होताना दिसेल त्या आधी धोरणे ठरवावी लागतीलच. धन्यवाद दोन्हीही सदस्यांना, WikiSuresh (चर्चा) ०२:१७, १० एप्रिल २०१८ (IST)

उल्लेखनीयता साचा[संपादन]

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी, V.narsikar:

  • ह्या पानावर अनेक दुवे आहेत पण संदर्भ एकच आहे. तेव्हा निदान बातम्यांमधून तरी किमान विधानाला एक नसला तरी परिच्छेदाला एक संदर्भ असल्याशिवाय पडताळण्यासारखे वास्तव विश्वकोशात प्रस्थापित कसे होणार?
  • त्यामुळे मी उल्लेखनीयता साचा लावला आहे, लेख टिकवण्यात रस असणाऱ्यांनी संदर्भ भरावे आणि साचा काढावा, संदर्भ नाहीत तो पर्यंत कुठलाच मजकूर स्थिर म्हणून गृहित धरणे मला तरी अडचणीचे वाटते. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०२:०१, १७ सप्टेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी, Sureshkhole:

नोंद घेतली. यासाठी मूळ लेखक/त्यानंतरच्या लेखकांना १५/३० दिवस (जे आपल्यास सोयीचे असेल ते) मुदत देऊया. त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करावी ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:४८, १७ सप्टेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी, V.narsikar: : मी कारवाई काहीच अपेक्षित धरत नाहीये, फ़क्त सध्याच्या अवर्गिकृत लेखांना वेगवेगळ्या वर्गात टाकून ज्याला रस आहे त्यांनी त्या त्या वर्गांवर काम करणे सोपे व्हावे अशी पुढे सोय करता येईल. माझे काम करण्याचे विषय ठरलेले आहेत त्या लेखांचा मी सोक्षमोक्ष लावत असतोच. त्यामुळे मुदतीचा मला काही प्रश्नच नाहिये. कारवाई अपेक्षित आहे ती सगळ काही असताना उल्लेखनीयता साचे का लावले गेले हे जाणण्यामध्ये. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १५:१४, १७ सप्टेंबर २०१८ (IST)