चर्चा:सूरज का सातवाँ घोडा
बदल साचा[संपादन]
@अभय नातू: नमस्कार, तुम्ही आताच या लेखावर "बदल" साचा लावला. काही इंग्रजी शब्द ज्याचे पर्यायी शब्द मला माहिती नाहीत, ते तसेच ठेवले आहेत. कदाचित त्यासाठी आपण हे केले असावे. कृपया हा साचा लावण्यामागचे हेतू सांगावेत, म्हणजे मला पुढील लेखांमध्ये त्या चूका टाळता येतील. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) ११:०६, ४ सप्टेंबर २०२२ (IST)
- @अमर राऊत:
- बदल साचा लावण्यामागे तीन मुख्य कारणे आहेत.
- इंग्लिश शब्द -- अशा शब्दांसाठी गूगल किंवा इतर शोधयंत्रांद्वारे मराठी शब्द शोधावे. प्रयत्न करुनही नाहीच मिळाले तर अशा शब्दांवर {{मराठी शब्द सुचवा}} हा साचा लावावा म्हणजे इतर लेखक त्यांना माहिती असलेले शब्द तेथे बदलतील.
- वर्गीकरण -- नवीन लेखांचे कटाक्षाने वर्गीकरण करावे. वर्ग नसल्यास तयार करावेत किंवा इतर वर्गांमध्ये घालावेत.
- साचा -- {{|माहितीचौकट पुस्तक}} किंवा तत्सम साचे वापरताना शक्य तितकी प्राचले (पॅरामीटर्स) घालावीत किंवा ती साच्यात रिकामी ठेवावीत म्हणजे इतर लेखक त्यांच्याकडे असलेली माहिती तेथे घालतील.
- तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ११:१६, ४ सप्टेंबर २०२२ (IST)