चर्चा:सुरेश (निःसंदिग्धीकरण)
Appearance
- @अभय नातू आणि V.narsikar: ह्या पानाला लावलेला साचा टायवीन यांनी द्वेषभावनेने लावलेला आहे, त्यांनी मुद्दाम मी केलेली पाने, सुरेश, मंजुषा कुलकर्णी-पाटील, १९२७ च्या नागपूर दंगली ह्यांवर संपादने करुन त्यांना अनावश्यक साचे लावले आहेत. टायवीनच्या भाषेत ह्यालाच सद्भावना म्हणतात का? आणि आणखीन टायवीनचा उत्पात आम्ही किती सहन करायचा? QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २०:१४, १९ नोव्हेंबर २०१८ (IST)
- @QueerEcofeminist:
- १. आम्ही म्हणजे कोण? या कंपूत कोण कोण शामिल आहेत?
- २. द्वेषभावना ही नक्की कशी कळली?
- ३. येथे अनेक ठिकाणी असे साचे लावले जातात. तुम्हीही असे साचे लावेलेले आहेत. नेमका याच पानावरील साचा का चुकीचा वाटतो आहे?
- ४. साचा का लावला जाऊ नये किंवा लावलेला साचा का चुकीचा आहे हे लिहा. खाली सुरुवात करुन दिली आहे.
- ५. प्रत्येक ठिकाणी तुमच्याविरुद्ध कट असल्याचे तुम्हाला वाटत आहे का?
- @Tiven2240:,
- हे पान निःसंदिग्धीकरण पान नाही असे कारण दिलेले आहे. असे पान न काढता त्याला निःसंदिग्धीकरण पान करा. त्यासाठी आवश्यक असलेली माहिती मिळवा किंवा इतरांकडून मदत मागा.
- आपल्या संपादनांतून कोणालाही आपल्याविरुद्ध कट केला जात आहे असा आभास सुद्धा येऊ देऊ नका. असे कोणाला वाटल्यास आपल्या संपादनांचा खुलासा द्या
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०९:४३, २० नोव्हेंबर २०१८ (IST)
- @अभय नातू: झाले. निःसंदिग्धीकरण पानात नेमकी तीच पाने असतात ज्याचे संबंध त्या विषयावर असते. त्यामुळे आवश्यक बदल केली आहेत. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) ०९:५८, २० नोव्हेंबर २०१८ (IST)
- @Tiven2240:,
- तुम्ही लेख असलेले दुवे ठेवून इतर सगळी नावे उडवली आहेत. यात सुरेश ओबेरॉय आणि तत्सम नावेही गायब झाली आहेत. निःसंदिग्धीकरण लेखात असलेल्या लेखांचेच दुवे असावेत हा नियम नाही. मराठी विकिपीडियावर लेख असणे हा उल्लेखनीयतेचा निकष मराठी विकिपीडियावरच लावला जाता कामा नये. असे केल्यास ते सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी हा प्रकार ठरेल. कृपया तुम्ही उडविलेल्या नावांबद्दल थोडासा शोध घेउन योग्य ती नावे परत आणावीत.
- खरे पाहता सुरेश हा लेख सुरेश या शब्दाचा अर्थ विषद करणारा असावा (@आर्या जोशी:) आणि येथील नावांची जंत्री सुरेश (निःसंदिग्धीकरण) येथे ठेवावी. याशिवाय येथून विक्शनरीवरील सुरेश लेखाकडेही दुवा द्यावा.
- अभय नातू (चर्चा) १०:०५, २० नोव्हेंबर २०१८ (IST)
@अभय नातू: काही बदल केली आहेत, कृपया तपासा. --Tiven2240 (चर्चा) १०:१७, २० नोव्हेंबर २०१८ (IST)
- धन्यवाद.
- सुरेश जोयचिम यांच्या नावाचा उच्चार कृपया तपासावा. स्पॅनिश आणि पोर्तुगीझ मध्ये Joachim चा उच्चार होआकिम किंवा वाकिम असा होतो. अर्थात, भारतात हे बदलले गेले असण्याची शक्यता आहे.
- अभय नातू (चर्चा) १०:१८, २० नोव्हेंबर २०१८ (IST)
- जॉकीम/जोकीम Joachim चा उच्चार आहे. --Tiven2240 (चर्चा) १०:२३, २० नोव्हेंबर २०१८ (IST)