चर्चा:सावित्रीबाई फुले

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला
विकिपीडिया:महिला हा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .


सावित्रीबाई फुले यांनी काढलेल्या शाळेपूर्वी निघालेल्या भारतातील शाळा[संपादन]

  • इ.स. १८१० साली या मिशनऱ्यांनी बंगाल प्रांतात मुलींची पहिली शाळा काढली. १८२७ पर्यंत मुलींच्या अशा शाळांची संख्या १२ पर्यंत गेली. विशेष म्हणजे या शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींची संख्या उल्लेखनीय होती.
  • महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढण्याच्या अगोदर एक वर्ष, १८४७ साली, प्यारी चरण सरकार यांनी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र यांच्या मदतीने बंगाल मधील बरसात येथे मुलींची शाळा सुरू केली. ती मुलींची शाळा आजही चालू आहे व ती काली कृष्ण गर्ल्स हायस्कूल या नावाने ओळखली जाते. त्या शाळेला सुरुवातीला तेथल्या लोकांनी खूप विरोध केला, परंतु जॉन इलियट ड्रिंकवाटर बेथून हा स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता इंग्रज अधिकारी पुढे आला व त्याने मित्र बंधू व सरकार यांना धीर दिला. १९४८ साली त्याने बरसात येथील मुलींच्या शाळेला भेट दिली. त्या शाळेमुळे जॉन बेथून इतका प्रभावित झाला की पुढच्याच वर्षी त्याने कलकत्ता येथे (७ मे १८४९ रोजी) मुलींसाठी एक शाळा सुरू केली. ती शाळा आज बेथून हायस्कूल म्हणून ओळखिली जाते. बेथूनने साली मुलींसाठी बेथून कॉलेज काढले (१२ ऑगस्ट १८५१). या दोन्ही संस्था आजही सुरू आहेत.
  • मुंबईतील गिरगावात स्ट्युडन्ट्‌स लिटररी अॅन्ड सायंटिफ़िक सोसायटीची (कमळाबाईंची शाळा म्हणून ओळखिली जाणारी मुलींची शाळा) फुल्यांनी काढलेल्या शाळेच्या थोडीशी नंतर सुरू झाली असावी.(तारीख बहुधा २१ ऑक्टोबर १९४९) ती शाळा आजही SL&SS High School या नावाने सुरू आहे....कमळाबाईंची मराठी शाळा, एक पारशी मुलींची शाळा आणि एक मुलांसाठीची इंग्रजी-मराठी शाळा एकाच दिवशी सुरू झाल्या.(The Sexual Life of English: Languages of Caste and Desire in Colonial India
By Shefali Chandra या पुस्तकातून.)....J (चर्चा) २०:५९, ५ मार्च २०१४ (IST)Reply[reply]

इतरत्र सापडलेला मजकूर[संपादन]

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) २३:३७, ११ जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घटनाक्रम
चित्र:सावित्रीबाई.jpg
सावित्रीबाई
इ. सन घटना वैशिष्ट्य
३ जाने १८३१ जन्म क्रांतीज्योतीचा जन्म नायगाव येथे नेवसेपाटलांच्या घरी झाला.
१८४० विवाह जोतीबा फुले यांच्याशी ९ व्या वर्षी .
१ जाने १८४८ शिक्षिका पुणे येथे मुलींच्या शाळेत पहिल्या शिक्षिका.
१६ नोव्हें १८५३ सत्कार मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली फुले दांपत्याचा सत्कार समारंभ संपन्न.
१६ ऑक्टो १८५१ शाळा तपासणी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेले परीक्षण, उल्लेखनीय अभिप्राय.
१८५३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कुमारी मातांसाठी मोलाचे योगदान.
१८५४ काव्यसंग्रह प्रसिद्ध काव्यफुले हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.
१८६७ समाजसेवा घरातील पाण्याचा हौद खुला केला.
१० मार्च १८९७ महानिर्वाण प्लेगने सावित्रीबाईंचे महानिर्वाण झाले.