चर्चा:विपस्सना
अधिकृत नावाने लेख हवा
[संपादन]@संदेश हिवाळे, Tiven2240, आणि अभय नातू: आचार्य गोयंका यांची केंद्रे/संकेतस्थळ/पुस्तके इ. सर्व ठिकाणी अधिकृतरीत्या विपश्यना असाच उल्लेख आहे.विपस्सना असे शीर्षक देण्याचे कारण नाही. आपले मत द्यावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:५८, ६ जून २०१८ (IST)
@सुबोध कुलकर्णी: नमस्कार ! आपण मला साद दिलेली नाही तरीही वाचनात आल्याने नोंदविले आहे. पाली साहित्यात विपस्सना असा शब्दप्रयोग असू शकेलही, पण संस्थेकडून प्रचलित नाव आपण म्हणता तसे विपश्यना असेच आहे. पाली संदर्भ मिळाल्यास लेखात एकादे वाक्य पाली उच्चारासंदर्भात घालून चालू शकेल. धन्यवाद !आर्या जोशी (चर्चा) १६:२१, ६ जून २०१८ (IST)
नकल-डकव
[संपादन]@Tiven2240 आणि अभय नातू: या लेखातला बराच मजकूर नकल-डकव केलेला आहे. हा अहवाल पहा आणि तपासून उचित कारवाई करावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:०१, ६ जून २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी:पूर्ण लेख कॉपी पेस्ट करून बनवले आहे यामुळे काढण्यात आले आहे--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:२२, ६ जून २०१८ (IST)
@सुबोध कुलकर्णी आणि Tiven2240: नकल डकव निर्णय पूर्ण झाला असेल तर मला या लेखावर नव्याने काम करायला आवडेल.मत नोंदवावे. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १६:२३, ६ जून २०१८ (IST)
- @आर्या जोशी: विकिपीडिया हे मुक्त ज्ञानकोश आहे ज्याला कोण्ही संपादित करू शकतो. आपल्याला यावर काम करायचे असेल तर आपण पूर्ण उत्साहाने करा. आशा आहे की हा एक चांगला लेख आपल्याला वाचायला भेटेल , :) --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १६:२७, ६ जून २०१८ (IST)
@Tiven2240: नक्कीच धन्यवाद! नकल डकव संदर्भातच थांबले होते मी, नाहीतर नंतर प्रश्न उपस्थित होऊ शकतील . लेख करते सुरु. आभार आर्या जोशी (चर्चा) १६:३७, ६ जून २०१८ (IST)
विपस्सना की विपश्यना
[संपादन]@संदेश हिवाळे, Tiven2240, अभय नातू, आणि सुबोध कुलकर्णी: सदर लेखाच्या नावाविषयी मत द्यावे. पुनर्निर्देशन करावे की कसे? धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १७:१९, ६ जून २०१८ (IST)
प्रचलित, अधिकृत वापरात विपश्यना असेच आहे. हिंदी व इतर भाषांतही. इंग्रजीत Vipassana आणि Vipassana Movement असे दोन स्वतंत्र लेख आहेत ते पहावेत. नाव बदलावे असे माझे मत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:३८, ६ जून २०१८ (IST)
मराठीत व हिंदीत उच्चार विपश्यना बरोबर आहे.येथे पहावे मी विपश्यना केंद्र इगतपुरी येथे भेट दिलेली आहे. त्यांच्या सर्व हिंदी मराठी साहित्यात विपश्यना असाच शब्द आहे. मराठीत विपस्सना असा शब्द मी प्रथमच पाहतो आहे. विपश्यना असाच उल्लेख ठेवावा प्रसाद साळवे (चर्चा) १८:१९, ६ जून २०१८ (IST)
Joshi, Salve & Kulkarni
'विपस्सना' ha शब्द pali bhashetil asava ase vatte. Kulkarni sir, aapan dilele 2 english wiki links madhe 'Vipashyana' nasun 'Vipassana' ase ahe. Pali bhashetil jankaranche mat ghyave.27.97.130.146 १९:२६, १३ जून २०१८ (IST)
विपस्सना हा पाली भाषेतील शब्द असेल तर त्याचे विपश्यना करावेच कागेल. कारण हा मराठी विकिपीडिया आहे. जीजस क्राइस्ट, ईसा मसीहा या नावाचा लेख मराठी विकिपीडियावर येशू ख्रिस्त या नावाने येतो, पाणिनि पाणिनी होतो. ... ज (चर्चा) २२:५६, १३ जून २०१८ (IST)
सर्वांचे आभार ! आर्या जोशी (चर्चा) ०७:००, १८ जून २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी, ज, प्रसाद साळवे, आणि आर्या जोशी:
- विपस्सना हा पाली भाषेतील शब्द आहे व विपश्यना हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. मात्र मराठी व हिंदी भाषेमध्ये 'विपश्यना' हा शब्द अधिक रुढ आहे. त्यामुळे मराठी विकिपीडियावरील या लेखाचे शीर्षक 'विपश्यना' असे करण्याबाबत माझी हरकत नाही.
- @ज: आपण विपश्यना लेख नव्याने बनवला आहेच व @आर्या जोशी: यांनी त्यात नवीन भर घातली आहे. कृपया, विपश्यना लेखात या (विपस्सना) लेखातून मजकूर स्थांनातरीत करून या पानाला विपश्यना वर पुनर्निर्देशित करावे. विकिडेटा कलम सुद्धा बदलावा लागेल. काही सहकार्य लागल्यास कळवावे, धन्यवाद.
- --संदेश हिवाळेचर्चा १३:५५, १८ जून २०१८ (IST)
@अभय नातू: नमस्कार ! या लेखात काही बदल झाले आहेत का ते आपण पाहू शकाल का? मला दिसत नाही आहेत पण मला असे वाटते आहे की मी कदाचित अधिक काम यावर केले असण्याची शक्यता आहे जे आत्ता दिसत नाही आहे. कदाचित माझे विसमरण असू शकेल पण तरीही आपण खात्री करून शकतो का? धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १८:३७, २३ जून २०१८ (IST)