Jump to content

चर्चा:मीरा अल्फासा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार, कृपया माहितीसाठी : auromarathi.org या संकेतस्थळावर यातील काही मजकूर आढळण्याची शक्यता आहे, पण त्यावर असलेले लेखन हे माझेच असल्याने प्रताधिकाराचा भंग होत नाही. तेव्हा त्यासाठी मजकूर वगळण्यात येऊ नये ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) ००:००, १७ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]


नमस्कार,लेखाचे नाव बदलण्यास मदत हवी आहे. मीरा अल्फान्सा च्या जागी मीरा अल्फासा असे पाहिजे. नजरचुकीने राहून गेले. कृपया कोणी दुरुस्त कराल का? Ketaki Modak (चर्चा) १५:३३, १७ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

"मीरा अल्फान्सा" has been moved to "मीरा अल्फासा"
A redirect has been created.
How to rename? वरील you tube video पाहून सुधारणा केली. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २०:३६, १७ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]
@Ketaki Modak:
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावर योगदान केल्याबद्दल धन्यवाद.
auromarathi.org या संकेतस्थळावर यातील काही मजकूर आढळण्याची शक्यता आहे, पण त्यावर असलेले लेखन हे माझेच असल्याने प्रताधिकाराचा भंग होत नाही. तेव्हा त्यासाठी मजकूर वगळण्यात येऊ नये ही विनंती.
हे लक्षात आणून दिल्याने गोंधळ कमी होईल यात शंका नाही परंतु काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. मराठी (व इतर भाषेतीलही) विकिपीडियावरील लेखन पूर्णपणे, पूर्णकाळासाठी प्रताधिकारमुक्त असते. येथील लेखनावर तुम्हाला हक्क सांगता येत नाही.
२. स्वतःचेच येथे दिलेले लेखन इतरत्र वापरल्यास मराठी विकिपीडियावरुन घेतल्याचा उल्लेख करण्याचा आग्रह आहे.
३. लेखन तुमचेच असले तरीही मूळ स्रोतावर हे लेखन मुक्त करीत असल्याचे जाहीर करणे आवश्यक आहे. तेथे असलेल्या इतर लाभधारकांकडून (प्रकाशक, इ.) त्यासाठी हरकत नसल्याचे (किंवा इतर लाभधारक नसल्याचे) येथे जाहीर करावे.
४. सगळ्यात महत्वाचे - आपले स्वतःचेच लेखन असल्याने व ते येथे मुक्त करीत असल्याने प्रताधिकारभंग कारणामुळे ते काढले जाणार नाही परंतु या लेखनास इतर निकष लागतीलच. यात संदर्भ नसणे, स्वतःचाच आणि अ-समसमिक्षित (अन-पीयर-रिव्ह्यूड) मजकूर असणे, प्रक्षोभक, घृणादायक मजकूर असणे, इ. चा समावेश होतो. प्रथमदर्शनी या लेखातील मजकूरात यांपैकी फारसे काही आढळत नाही परंतु वरील मुद्द्यांकडे लक्ष घालून हे लेखन स्पष्टपणे प्रताधिकार मुक्त करावे तसेच संदर्भ घालावेत ही विनंती
तुमच्याकडून यापुढे मराठी विकिपीडियावर मोठी भर पडेल या आशे व अपेक्षेसह.
अभय नातू (चर्चा) २३:५३, १७ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]
दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद!
मुद्दा क्र.०३ - ना हरकत कोठे जाहीर करणे आवश्यक आहे? चर्चा पानावर का?
मुद्दा क्र.०४ - हे लेखन स्पष्टपणे प्रताधिकार मुक्त करावे - कसे केले जाते? त्याचा एखादा आदर्श नमुना पाहायला मिळेल का?
बाकी आपण सांगितलेल्या सूचना नक्की लक्षात ठेवते.
धन्यवाद! ''Ketaki Modak (चर्चा) २२:१८, १८ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]
@Ketaki Modak:
आधी क्र. ०४ - येथे चर्चा पानावर केल्यास हरकत नाहीत असे करताना हे लेखन आपल्याच प्रताधिकारात असल्याचा शक्य तो पुरावा द्यावा. हे इतरत्र आधी प्रकाशित झालेल्या मजकूरास लागू होते. उदा. पुस्तक, इतर संकेतस्थळे, इ. करता. एरवी येथे पहिल्यांदा झालेले लेखन आपोआपच प्रताधिकारमुक्त असते (ccby-sa लायसन्सतहत). तुम्ही जेव्हा लेखन जतन करता तेव्हा तेथील नोंदीत हे लिहिलेले असतेच.
क्र. ०३ - इतरत्र आधी प्रकाशित झालेले आपले लेखन प्रताधिकारमुक्त करीत असल्याचे येथे जाहीर करावे आणि त्याआधी मूळ ठिकाणीही ते जाहीर करावे - उदा. पुस्तक असल्यास प्रकाशकास पत्र (जर हक्क तुमच्या आधीन असेल तर), प्रकाशकाचे ना-हरकत पत्र (जर हक्क प्रकाशकाधीन असतील तर), मूळ लेखन असलेल्या संकेतस्थळावर नोंद (हे लेखन विकिपीडियावर प्रकाशित करीत असल्याची).
अर्थात, अशा लेखनास वर लिहिल्याप्रमाणे इतर निकष लागतातच.
आणि पुन्हा एकदा आठवण - थेट येथे करीत असलेले लेखन प्रताधिकारमुक्तच असते व तुम्ही त्यावरील हक्क आपसूकच सोडत असता :-)
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०८:५४, १९ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]
माहितीसाठी धन्यवाद. लवकरच आवश्यक ते करते.
''Ketaki Modak (चर्चा) २१:४२, १९ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]