चर्चा:महाराष्ट्रामधील धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मदत[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू:, Gnome-edit-redo.svgMahitgar: सर,

या लेखातील वापरलेल्या तक्त्यात हिंदू वगळता कोणताही धर्म दिसत नाही, कृपया त्यातील त्रुटी दूर करा. --संदेश हिवाळेचर्चा ०८:५४, २६ जुलै २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ०८:५४, २६ जुलै २०१७ (IST)

सुधार[संपादन]

Gnome-edit-redo.svg: कृपया, या लेखातील ख्रिश्चन, शिख, पारशी व ज्यू या विभागात इंग्रजी लेखानुसार सुधार करण्यास मदत करा. या विभागात शब्दरचना व वाक्यरचना यांच्या सुधाराची आवश्यकता आहे. --संदेश हिवाळेचर्चा १३:०४, २७ जुलै २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १३:०४, २७ जुलै २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: सर, शिख, पारशी व ज्यू विभागातील लेखन कदाचित मशिन ट्रान्सलेशनच्या सहाय्याने झाले असावेत. मराठी विकिपीडियावर अनुवाद सुधारणेसाठी वेळ देण्या एवढे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. साचा:मट्रा आपणास मशिन ट्रांसलेशन निती बद्दल कल्पना देतो. मशिन ट्रान्सलेशन मोठ्या प्रमाणावर करणे टाळावे तसेच किमान धार्मीक, सामाजिक राजकीय विवाद्य विषयातही लगेच दुरुस्ती शक्य नसल्यास मशिन ट्रांन्सलेशन टाळणे गैरसमज टाळण्यास साहाय्यभूत होईल असे वाटते.
आपल्या संपादनांसाठी शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५५, २९ जुलै २०१७ (IST)
Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: शीख परिच्छेदातील पुढील वाक्ये (अनुवाद) व्याकरण दृष्ट्या योग्य वाटत नाहीत.
  • हजूरसाहेब ("स्वामीची उपस्थिती"), तसेच हजूर साहिब यांनी लिहिली,
  • ही शीख धर्मातील पाच ताटांपैकी (तात्पुरती अधिकारांची जागा) एक आहे.
  • तिथेच गोदावरी नदीच्या काठावरच्या नांदेध गावी,
  • कॉम्प्लेक्सच्या आतील गुरुद्वाराला 'सच-कांड' असे म्हणतात.
योग्य दुरुस्त्या कराव्यात हि विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:०७, २९ जुलै २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svg: यांनी शिख धर्म या विभागात सुधार केला होता म्हणून, मी त्याला योग्य म्हणालो होता. अजूनही त्यात चूका शिल्लक असतील तर नक्कीच दुरूस्ती करण्यात येईल. --संदेश हिवाळेचर्चा ००:२६, ३० जुलै २०१७ (IST)


जैन विभागातील "राष्ट्रकूट आणि चालुक्यसारख्या ख्रिश्चन युगाच्या पहिल्या हजार वर्षांपासून महाराष्ट्रातील शासक जैन धर्माचे अनुयायी होते." वाक्यात शब्दक्रम बदलण्याची आवश्यकता असावी. स्थानिक जैन धर्मीय महाराष्ट्रात प्राचीन काळापासून आहेत तेव्हा स्थानिकांचा उल्लेख आधी असणे श्रेयस्कर असावे का असे वाटते.
ख्रिश्चन विभागातील शेवटचे वाक्य तपासावे. शेवटच्या वाक्याचा अर्थ लावणे कठीण वाटते आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४७, ३० जुलै २०१७ (IST)

‎ख्रिश्चन धर्म विभाग[संपादन]

Gnome-edit-redo.svg: आपण ख्रिश्चन धर्म विभागातील माहितीसाठी कोणते संदर्भ वापरले आहेत. विशेषत: ३३००० हून अधिक पंथांच्या उल्लेखासाठी आपण कोणता संदर्भ वापरला आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:५२, ३१ जुलै २०१७ (IST)


Gnome-edit-redo.svgमाहितगार: अनेक वर्षे मुंबईतील सरमिसळ (कॉस्मॉपॉलिटन) विभागात राहिल्यामुळे माझी ख्रिश्चन लोकांशी खूप घसट होती. त्यांच्या पंथांची विविध चर्चेस माझ्या रोजच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर होती. त्यामुळे माझी बरीचशी माहिती माझ्या सामान्य ज्ञानावर आधारलेली आहे. तरी पण ३३००० या आकड्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेला ख्रिश्चन एनसायक्लोपीडिया पहावा. या ज्ञानकोशाचा परिचय या पानावर वाचायला मिळेल. .... (चर्चा) १७:३९, ३१ जुलै २०१७ (IST)

  • Gnome-edit-redo.svgअभय नातू: या विभागातील शेवटचे आंबेडकरांच्या चळवळीच्या परिणामा बद्दलच्या इंग्रजी विकिपीडिया लेखातील वाक्याचा सगळेजण काही विपरीतसा अनुवाद करत असावेत असे वाटते आहे.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०३, ३१ जुलै २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgMahitgar:,
मला वाटते आहे की तुमच्या वरील संदेशानंतर या वाक्यात बदल झालेले असावेत कारण तथापि, या ख्रिश्चन धर्मांतराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदयाने आणि बौद्ध धर्मातील प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणावर आळा बसला हे वाक्य संदर्भातील मजकूरास धरून वाटत आहे.
अभय नातू (चर्चा) २०:२२, ३१ जुलै २०१७ (IST)

इस्रायली आळी[संपादन]

१८५७च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर बेने इस्रायली सैनिकांची कुटुंबे पुण्याच्या रास्ता पेठेत, विशेषत: लकेऱ्या मारुतीच्या समोरील रस्त्याच्या दुतर्फा स्थायिक झाली होती. त्याला इस्रायली आळी असे नाव होते.

इस्रायली आळी हे नाव कधी होते? इस्रायेल देशाची स्थापना होईपर्यंत ज्यू लोक यहूदी नाव सहसा वापरत असत तरी त्यांनी १९व्या शतकात इस्रायेल नाव घेणे curious आहे. अर्थात, पुण्यात हे नाव असेलही पण कोठे पुरावा (वृत्तपत्रे, पत्रव्यवहार, इ.) मिळू शकेल का? याने भारतातील इस्रायेल या संकल्पनेचा इतिहासही निश्चित होईल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २३:११, ३१ जुलै २०१७ (IST)