चर्चा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके
या लेखाविशयी -
महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने आयोजीत विकिपीडिया:'विषयतज्ञांसोबत संपादन कार्यशाळेनंतर सदर लेखाचे संपादन होत असुन या लेखात महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांची यादी मिळेल. column title sorting पर्याय वापरुन आपणास
महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागानुसार, ...... महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार ...... रेल्वे विभागवार .... रेल्वे मंडळवार
रेल्वे स्थानकांची यादी बघता येईल.
रेल्वे स्थानकांची इतर काही माहितीदेखील या पानावर उपलब्ध होईल.
- जामनेर या स्थानकाचा समावेश करावा.
--प्रसाद साळवे (चर्चा) १३:२९, २९ जानेवारी २०१७ (IST)
चुका
[संपादन]या लेखाचे संपादन होत असुन या लेखात काही रेल्वे स्थानकांची मराठी नावे आणि समुद्रसपाटीपासुनची उंची इतर संकेतस्थळांवरुन संकलित केली असल्याने त्यात चुक होऊ शकते.
रेल्वे स्थानकांची नावे आणि समुद्रसपाटीपासुनची उंची तपासण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक स्थानकाला भेट देणे लेखकास तूर्त शक्य नाही. तरी यात काही चुक आढळल्यास आपल्या सुचना येथे नोंदविल्यास हा लेख अधिक अचुक होण्यास मदतच होईल.
महत्वाची टीप: कित्येक ठिकाणी गावाचे नाव आणि रेल्वे स्थानकाचे नाव यात फरक असतो. फक्त रेल्वे स्थानकावरील "फलकावर असलेले अधिकृत नाव आणि उंची" या ठिकाणी नोंदवावे.
धन्यवाद.
- लेखक
@Yogeshs: आपण तयार करीत असलेल्या यादी बद्दल अभिनंदन.
वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानके, वर्ग:मुंबईतील रेल्वे स्थानके, वर्ग:मध्य रेल्वे, वर्ग:पुणे उपनगरी रेल्वे ह्या आणि अशा कित्येक पानावर आपणांस मुंबईतील अनेक स्थानकांच्या विकिपीडिया पानांची यादी मिळेल. ती पाने तुमच्या महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके ह्या पानाशी जोडता येतील.
--नितीन कुंजीर (चर्चा) १३:२४, २३ जानेवारी २०१७ (IST)
सल्ला
[संपादन]या स्थानकाची माहिती विकिपीडियावर आहे. कृपा त्याला [[ ]] करून जोडावे टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:३७, २३ जानेवारी २०१७ (IST)
हा लेख वाचत असतांना, त्यात नावात अनेक चुका दिसल्या. त्या लेखकाने दुरुस्त कराव्या असे वाटते.
- जळगांव-भदली = भडाळी असे हवे
- धुळे - मोरदाद टांडा= मोरदाद तांडा
- मोहदी = मोहदी प्रगणे
- अमरावती - टिंटाला=टिमटाळा
- टाळणी=तळणी - वालगाव=वलगाव
- नागपूर - मोवद = मोवाड
- सलवा=सालवा
याशिवायही अधिक असू शकतात. मला दिसलेल्या येथे टाकल्या आहेत.
--चिबू (चर्चा) १६:३५, २६ जानेवारी २०१७ (IST)
- सदर् लेख् हा खुपच् महत्त्वपुर्न असुन् तो मराठीमधे असल्यामुळे समजन्यास् सोपा आहे. <-- सदस्य Paryavarn rakshak यांची प्रतिक्रिया
जिल्ह्याच्या ठिकाणाची रेल्वेस्थानके
[संपादन]जसे ठाणे जिल्ह्यात ठाणे हे रेल्वेस्थानक सारणीत दिसते तसे रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी पुणे जिल्ह्याती पुणे इत्यादी जिल्ह्याच्या ठिकाणाची रेल्वेस्थानके सुद्धा दाखवून झाली आहेत का ? की काम अद्यापबाकी आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५७, २९ जानेवारी २०१७ (IST)