चर्चा:भारती कृष्ण तीर्थ कृत गणित लेखन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडियावर ‘वैदिक गणित’ हा लेख लिहिणार्‍या या ‘मंगला नारळीकर’ कोण आहेत, हे मला माहीत नाही, पण त्या रँग्लर जयंत नारळीकर यांच्या पत्‍नी नसाव्यात.

जयंत नारळीकरांच्या पत्‍नी मंगला नारळीकर या फार मोठ्या गणितज्ञ आहेत आणि त्या असले धादान्त खोट्या विषयावरचे लेख लिहिणे शक्य वाटत नाही.

वैदिक गणित नावाचे कसलेही गणित वेदांत नाही. भारती कृष्ण तीर्थ नावाच्या स्वामीला सापडलेल्या एका तथाकथित चोपड्यावरून त्याने ते प्रचलित केले. स्वत: जयंत नारळीकर यांंनी या बनावट वैदिक गणिताबद्दल अनेकदा लिहिले आही, आणि त्यांच्या भाषणांतूनही या गणिताला टीकास्त्राने झोडले आहे.

रँग्लर नारळीकरांच्या ‘The Scientific Edge: The Indian Scientist from Vedic To Modern Times’ या पुस्तकातील ‘There is the question of Vedic Mathematics which, on examination, turns out to be neither Vedic in its origins nor mathematics, if this is conceived as a body of rigorously worked out deductions from a few postulates.' या वाक्यावरून वैदिक गणित हे बनावट (Bogus) गणित असल्याची खात्री पटावी.

जयंत नारळीकरांच्या पत्‍नीशी नामसाधर्म्य असलेल्या या मंगला नारळीकर यांचा हा लेख विकिपीडियाला शोभा देणारा नाही, तो तात्काळ हटवावा. .... (चर्चा) ००:५६, १४ मे २०१७ (IST)Reply[reply]


काही विकिपीडियन्सना नेमक काय चालु आहे ते डिटेल मध्ये न तपासता घाऊक संपादनांची घाई असते; तर काही विकिपीडियन्सना डिटेल्स न तपासता निष्कर्ष काढण्याची घाई असते.
पहिली गोष्ट इतर सर्वसामान्य स्त्रीचे एखाद्या असामान्य मंगला नारळीकरशी नाम साधर्म्य असणे हा गुन्हा नसावा. असामान्य मंगला नारळीकरांची जाणीवपुर्वक बदनामीचाही प्रयत्न नसावा. वस्तुत: या मंगला नारळीकर सामान्य असोत अथवा असामान्य एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी दिलेला संदर्भ दुवा संबंधीत विषयाचे वस्तुनिष्ठ आकलनच करतो हे संदर्भ दुवा उघडून वाचण्याचे कष्ट घेतल्यास लक्षात येईल. मंगला नारळीकरांनी केलेल्या संपादनातील वाक्य 'असे मानले जाते.त्या संदर्भात अलीकडे वास्तवात काही नव्या पद्धतीचे गणित शिकवले जाते.' असे होते, संपादन बांधणीतील घाईतील सदस्य महोदयांनी वाक्यामध्ये सॉलीड फेरफार मारला आणि आपल्या (गैर)समजुतीनुसार वाक्यात सुधारणा (?) केली. "यावर प्रा. दाणी आधुनिक तज्ञांनी चांगले विश्लेषण केले आहे." असे वाक्य मंगला नारळीकरांनी लिहीले दाणींनी त्यांच्या लेखनातून "भारती कृष्ण तीर्थ" यांच्यावर त्यांचे गणित वैदीक असण्याच्या दाव्यावर सडकून टिका केली आहे. पण दुसऱ्या संपादक महोदयांनी ते वाक्य वगळले आणि कॉमेंट करणाऱ्या संपादक महोदयांनी संदर्भ उघडून बघण्याची तसदी घेतली नाही. मंगला नारळीकर नवीन संपादिका असल्यामुळे अथवा व्यस्ततेमुळे बहुधा "काही लोक शाळेतील मुलांना 'वैदिक गणित' शिकवतात." हे वाक्य अर्धवट राहीले असावे त्यांचे लेखन पूर्ण झाल्यास त्यांनी दाणींच्या लेखावर आधारीत पूर्ण प्रकाश पाडला असता.
विकिपीडिया सावकाश विकसीत होणारा ज्ञानकोश आहे याचा अनुभवी विकिपीडियनना विसर पडतो. दुसरे एखादी व्यक्ती एखाद्या विषयातील तज्ञ असेल तरी मराठी युनिकोड लेखन आणि विकिपीडियातील विवीध तंत्राशी जुळवून घेण्यास नवागतांना वेळ लागतो.
एक ज्येष्ठ वैज्ञानिक मराठी विकिपीडियाची भलावण करण्याच्यादृष्टीने नारळीकरदांपत्याशी संपर्क करणार होते असे ऐकुन होतो. त्यामुळे या मंगला नारळीकर कदाची त्या मंगला नारळीकर नसूही शकतील किंवा 'ज'ंची निश्कर्ष घाई फोल ठरवत असूही शकतील पण शेवटी ज्ञान काय ते महत्वाचे, विकिपीडियन संपादकांच्या नावात काय ठेवले आहे ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२७, १४ मे २०१७ (IST)Reply[reply]

ज्या मंगला नारळीकर गणितावर असले फालतू लेख लिहितात त्या जयंत नारळीकर यांच्या पत्‍नी असणे शक्य नाही, या निष्कर्षावर मी ठाम आहे. या मंगला नारळीकरांनी कोणताही तथाकथित वस्तुनिष्ठ आकलनात्मक संदर्भ दिला नव्हता. ... (चर्चा) २२:१३, १४ मे २०१७ (IST)Reply[reply]


बाकीच्या चर्चेला उत्तर सध्या उत्तर न देता सांगू इच्छितो की वेळचे वेळी शक्य तितके तर्कशुद्ध बदल केले नाहीत तर मराठी विकिपीडिया हा अर्थहीन शब्द, वाक्ये आणि लेखांचा उकिरडा होऊन बसेल. याची अनेक उदाहरणे आहेत. तरी Assume Good Faith हा विकिपीडियाच्या पाच आधारस्थांतील एक आठवावा आणि असे Good Faithमध्ये बदल करणाऱ्यांवर टीका करू नये ही आग्रहाची आणि नम्र विनंती.
अभय नातू (चर्चा) २१:१७, १५ मे २०१७ (IST)Reply[reply]