चर्चा:भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या कसोटी सामन्यांची यादी
Appearance
तुमच्या खेळ/क्रीडाविषयक भरीव योगदानास अनुसरुनच हा लेख आकार घेत असल्याचे पाहिले. धन्यवाद.
यात प्रत्येक कसोटी मालिकेचा रकाना घालून तेथून योग्य त्या लेखाकडे दुवा दिला तर ही माहिती उपयुक्त ठरेल असे वाटते. अर्थात, तुमच्या जोमाने चालू असलेल्या कामाला खीळ नको. जर हे काम क्लिष्ट/किचकट असेल तर ते हे नंतर केले तरी चालेल पण पटकन होण्यासारखे असेल तर ते जरुर करावे.
पुन्हा एकदा धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २३:५२, ४ डिसेंबर २०१९ (IST)
- आपण दाद दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मुळात क्रिकेट आणि राजकारण हे माझे जीवन आहे. आपण म्हणालात तसं रकाना घालता येईल पण प्रत्येक कसोटी मालिकेचे पान तयार नाही झाले आहे. त्यामुळे लाल दुवा येईल आणि तो बघायला विचित्र वाटतो. लेखामध्ये प्रत्येक सामन्याला त्याचा ESPN चा दुवा दिलेला आहे. बघु पुढे जमतं तस करेन. विकिपिडियावर लेखन, राजकारणातील सहभाग आणि शिक्षण सांभाळताना कसरत होती 😀