Jump to content

चर्चा:बहावा

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  1. जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत आधी दोन-तीन दिवस रोज सकाळी १५ ते २० मिलिलिटर तूप देऊन तिसऱ्या दिवशी रात्री जेवणानंतर आरग्वध (बहावा/अमलताश)-मगज १५ ते २० ग्रॅम पाण्याबरोबर द्यावा. आरग्वध मगज हा गाभुळ चिंचेसारखा पदार्थ असतो. यामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातले पित्त पडून जाते.

काविळीमध्ये तेल-तूप वर्ज्य असते. दोन-तीन दिवस रोज सकाळी तूप खाण्याने कावीळ भडकेल, बरी होणार नाही. काविळीवर कोणतेही औषध नसल्याचे डॉक्टर पुन्हापुन्हा सांगतात. तेल-तूप (आणि स्निग्धांश असलेले बिस्किटे, चॉकलेटे, दूध, मासे वगैरे वगैरे) पदार्थ वर्ज्य केले आणि भरपूर ग्लुकोज सेवन केले की कावीळ आपोआप बरी होते. त्यामुळे लेखात दिलेल्या अघोरी उपायाचा मजकूर काढून टाकावा.... (चर्चा) २२:४५, ९ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply

कर्णिकार

[संपादन]

कर्णिकार म्हणजे चाफा. कृपया गुगल करुन तपासणी करून घ्यावी संतोष गोरे (चर्चा) ०७:५६, १० जून २०१८ (IST)Reply

काहि ठिकाणी एक प्रकारचा बहावा पण म्हटलं आहे. असो. बहुधा दोन्ही वृक्ष असावेत

संतोष गोरे (चर्चा) ०८:०४, १० जून २०१८ (IST)Reply