चर्चा:पंढरपूर रेल्वे स्थानक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अमर राऊत:,

तुम्ही या लेखात आपला प्रताधिकार (कॉपीराइट) असल्याचे वॉटरमार्क असलेली चित्रे लावलेली आहेत. विकिपीडिया आणि कॉमन्ससह विकिमीडिया प्रकल्पांवर प्रताधिकारित मजकूर, चित्रे किंवा संचिका ठेवता येत नाहीत. तरी ही चित्रे काढावीत किंवा प्रताधिकारित नसलेली चित्रे लावावीत ही विनंती.

प्रताधिकार सोडलेली चित्रे चढवलीत तर ती चित्रे जगातील कोणतीही व्यक्ती विकिपीडियाचा उल्लेख करुन (तुमचा उल्लेख न करता) वापरू शकतात हे सुद्धा लक्षात घ्यावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १०:०४, १ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]

@अभय नातू,
नमस्कार सर,
मला विकीपिडीयावर चित्रे वापरण्याबाबत बऱ्याच शंका आहेत. हळूहळू तुमची मदत घेत जाईन. तूर्तास एक शंका विचारतो. जर या चित्रांमधून "©" काढून फक्त नाव ठेवलं तर चालेल का?
कॉमन्सवर अशी बरीच चित्रे आहेत, ज्यात संबंधित संस्थांनी त्यांचे वॉटरमार्क वापरले आहेत. हिंदी अभिनेत्यांच्या बऱ्याच चित्रांवरती "बॉलीवूड हंगामा"चा वॉटरमार्क दिसतो. आणि ही चित्रे इंग्रजीसह बहुतेक भारतीय भाषांच्या विकीपिडीयावर वापरली जातात. मग माझ्या चित्रांवरती नुसते नाव ठेवून "कॉमन्स"वर अपलोड केलेले चालेल ना?
धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) १४:३२, १ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]
@अमर राऊत:
जर या चित्रांमधून "©" काढून फक्त नाव ठेवलं तर चालेल का?
नाही. चित्रात कोणत्याही प्रकारचा व्यक्तिगत उल्लेख नको, विशेषतः चित्र घेणाऱ्याचा.
कॉमन्सवर अशी बरीच चित्रे आहेत, ज्यात संबंधित संस्थांनी त्यांचे वॉटरमार्क वापरले आहेत.
प्रत्येक चित्रामागची भूमिका नेमकी कळणे अवघड आहे परंतु साधारणतः हे चालत नाही.
हिंदी अभिनेत्यांच्या बऱ्याच चित्रांवरती "बॉलीवूड हंगामा"चा वॉटरमार्क दिसतो.
हे चुकीचे आहे. ही चित्रे वेळोवेळी काढली जातात.
माझ्या चित्रांवरती नुसते नाव ठेवून "कॉमन्स"वर अपलोड केलेले चालेल ना?
नाही. तुमचे नाव त्यावर नको. चित्र चढविताना तुमचे नाव व योगदान नमूद केले जातेच.
अभय नातू (चर्चा) २१:१४, १ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]
ठीक आहे सर. माहितीसाठी खूप धन्यवाद.
तुम्ही म्हणताय तसं कोणत्याही नावाविना चित्रे जोडतो. हेतू एवढाच होता की बऱ्याच ब्लॉगींग साइट्स किंवा खाजगी संकेतस्थळे स्वतःचे काम म्हणून हे फोटो चालवतात. आणि त्यातून पैसेही कमावतात. मग मूळ कलाकाराला याचे साधे श्रेयदेखील मिळत नाही.
असो. विकिपीडियाच्या नियमाच्या विरुद्ध असेल तर काढतो चित्रे.
धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) २१:४८, १ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]