Jump to content

चर्चा:तात्याराव लहाने

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखातील बराचसा भाग पुढील संकेत्स्तालावरून जसा च्या तसा उतरवण्यात आला आहे. http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20111231/5312878196652021601.htm
आभिजीत १४:५१, २९ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

लेखाचे नाव "पद्मश्री तात्याराव लहाने" असावे असे वाटते.
नितीन (चर्चा) १३:१७, १९ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

विकिपीडिया वर नवीन पान तयार करताना त्याचे शीर्षक कसे असावे या साठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतविकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत वाचावे.
  1. विकिपीडिया ज्ञानकोशात व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना मूळ लेखपानाचे शीर्षकात अद्याक्षरे टाळावीत, त्यांच्या संपूर्ण नावाने शीर्षक ठेवावे असा लेखन संकेत आहे.
  2. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.खालील सर्वच प्रकार शीर्षकात टाळावे:
श्री./सौ/डॉ./प्रा/प्रो/ॲडव्हो/नामदार/सर/क्रांति(वीर|सिंह)/महात्मा /(लोक|महा)(नायक|मान्य|नेते) /शाहीर /सेनापती /स्वातंत्र्यवीर /सम्राट /छत्रपती /महाराज /स्वा(मि|मी) /गु(रु|रू) / स्वा(मि|मी) | गु(रु|रू)|संत /सेंट /ऋषी /(गोसावी|फकीर|हजरत|धर्माचार्य||महामंडलेश्वर|योगी) / बा(बा|पू)|(फादर|पोप) /भारतरत्न /पद्म(श्री|भूषण|विभूषण) /(नाम|आम|खास)दार /सेवक|कैवारी
    • अपवाद विशेषनामात समावेश.
    • (छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले एकमेव अपवाद शिर्षक आहे ज्यात पदाचा समावेशास सहमती/स्वीकृती आहे.इतर कोणतेही मूळ शीर्षक अपवाद असणे मराठी विकिपीडियावर सहसा अभिप्रेत नाही.)

व्यक्ती नांवांबद्दलचे शीर्षक संकेत

[संपादन]
  • व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.[अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते(alphabetical categorisation)].
  • व्यक्तीस विश्वकोशीय उल्लेखनीयता आहे म्हणूनच विकिपीडिया ज्ञानकोशात लेख असतो. ज्ञानकोशाच्या वाचकास विशेषण पदव्यांनी संपादकाची आणि ज्ञानकोशाचा सॉफ्ट कॉर्नर आहे असे वाटल्यास अथवा निष्पक्षता बाधीत होते आहे असे वाटल्यास विशेषण पदव्यांचा ज्ञानकोशाची विश्वासार्हता बाधीत होण्या पलिकडे काहीही फायदा होत नाही. ज्ञानकोशाचे काम वस्तुनिष्ठ माहिती देण्यापर्यंत मर्यादीत आहे. व्यक्तीत्वे स्वकतृत्वावर अवलंबून असतात. त्यांच्या कतृत्वा/कार्याबद्दल वस्तुनिष्ठ माहिती वाचल्या नंतर वाचकाच्या मनात आपोआप सुयोग्य जागा निर्माण होते. त्याकरता ज्ञानकोशाच्या संपादकांनी आपले सॉफ्ट कॉर्नर त्यात मिसळण्याबद्दल विचार करण्याचा मोह टाळलेला बरा
  • अजून एक महत्वाची बाजू, नवीन येणाऱ्या सदस्य वाचकांना/संपादकांना सर्वसामान्य इतर लेखन क्षेत्रांपेक्षा ज्ञानकोशीय परीघ वेगळा आहे आणि त्यास मर्यादा आहेत याची ओळख लेख वाचताना सुरवाती पासून राहील्यास. पुढे नवागत संपादक लेखन चालू करतात तेव्हा त्यांना येथे निष्पक्षतेच्या आणि विवीध ज्ञानकोशीय मुल्यांचे भान सातत्याने रहाण्यास मदत होते म्हणूनही उपरोक्त शीर्षकलेखन संकेत होता होईतो पाळले जाणे गरजेचे असते.

प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलित नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमूद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मूळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी. जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा.

अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखन असलेल्या शीर्षकाकडे स्थानांतरित करावीत आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे. परंतु लोक अशुद्धलेखन असलेले शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहिले, तर मात्र ते पान तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःर्निदेशित करावे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:५२, १९ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

माहितीबद्दल आभारी आहे...
नितीन कुंजीर १७:२०, १९ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

त्याहुनीही महत्त्वाचे

[संपादन]

विकिपीडियावरच नाही, तर कोठेही पद्मश्री आदी उपाध्या नावाआधी लिखित स्वरूपात वापरता येत नाहीत. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर असे लिहिणे अनुचित आहे. पहा : पुरस्कार लेखाची प्रस्तावना.....J (चर्चा) २१:४९, १९ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

>>विकिपीडियावरच नाही, तर कोठेही पद्मश्री आदी उपाध्या नावाआधी लिखित स्वरूपात वापरता येत नाहीत. <<
होय हि बाब माझ्याही मागे वाचनात होती.वस्तुत: भारतातील शासकीय पुरस्कार हे उपाधी नव्हेतच. पुरस्कार उपाध्या म्हणून नावाआधी न लावण्या मागे काही एक वेगळी रास्त भूमीका होती. (ब्रिटीश सांसदीय पद्धतीने 'सर' सारख्या उपाध्या देऊन उपाधी धारकांना वेगळा 'क्लास'कॅटेगरी निर्मिलेली होती त्याची (सरंजामशाहीची) पुनरावृत्ती भारतात होऊ नये अशी काही भूमीका होती का ?), त्या भूमीकेच्या पार्श्वभूमीचे आणि आधिकृत शासकीय धोरणासंबंधी माहिती संदर्भासहीत उपलब्ध करून दिली जाऊ शकल्यास आणि आपण म्हणतात त्या प्रमाणे त्या माहितीचा संदर्भा सहीत पुरस्कार लेखात अंतर्भाव करता आल्यास पहावे.

अर्थात ज्ञानकोशात उपाध्या नावामागे लिहिण्याचे टाळण्या मागे वस्तुनिष्ठता टिकवणे हा महत्वाचा भाग आहे. जगातील कोणतीही व्यक्ती गुण दोषांसहीतच येते पूर्ण हिरो किंवा पूर्ण व्हीलन म्हणून व्यक्ती चरीत्र एकाच अंगाने रंगवणे हि व्यक्ती पूजा अथवा व्यक्ती द्वेष ठरतो. ज्ञानकोशाला वस्तुनिष्ठता व्यक्तीनिरपेक्षता जपावयाची असल्यामुळे पुरस्कारांची उपाध्यांची दखल घेतानाच पूजा आणि द्वेष हे दोन्ही भावनागत दृष्टीकोण टाळावयाचे असतात आणि तर्कसंगत वस्तुनिष्ठ माहिती द्यावयाची असते माहितीची सत्यनिष्ठता समतोल साधावयाचा असतो.जर शीर्षकातच उपाधी इत्यादी स्विकारल्यास लेखन करताना केवळ एकच बाजू रंगवली जाण्याची शक्यता निर्माण होते, त्या शिवाय वाचकाची भूमिका वाचकाला न ठरवू देता आपण आपली भूमिका त्यात मिसळत असतो.हे टाळावे असा ज्ञानकोशाचा दृष्टीकोण असतो त्यामुळे ज्ञानकोशाच्या भूमीकेस स्वत:चा वेगळा दृष्टीकोण आहे आणि तो स्वत:च्या जागी ज्ञानकोशा करता महत्वाचा आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:५९, २० ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

प्रताधिकार भंग

[संपादन]
झाले.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:३७, ७ जुलै २०१८ (IST)[reply]