चर्चा:डॉनल्ड ट्रम्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉनल्ड ट्रंप[संपादन]

मराठीत सानुनासिक उच्चारांसाठी अनुस्वार लिहायची रीत असल्यामुळे या लेखाचे शीर्षक "डॉनल्ड ट्रंप" असे लिहायला हवे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:१३, ७ डिसेंबर २०११ (UTC)

ट्रम्प मधील म् कार सानुनासिक नसून म् चा उच्चार स्पष्टरीत्या होतो तरी ट्रम्प असे बरोबर असावे.
अभय नातू (चर्चा) १२:१३, ११ ऑक्टोबर २०१६ (IST)

---डोनाल्ड ट्रंपच्या योग्य मराठी लिखाणासाठी पहा : अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनंत लाभसेटवार या लेखकाच्या ट्रंप या पुस्तकातील सातवे पान-चौथी ओळ आणि पुढच्या अनेक ओळी. [१] .... (चर्चा) १३:०४, ३ एप्रिल २०१९ (IST)

दुसरे : शुद्धलेखनाच्या चालू नियमांनुसार मराठीत सानुनासिक उच्चार अभावानेच राहिले आहेत, टपालहंशील, हं हं, हुं हुं, हंशा, आम्हांला, कांसे पितांबर, कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनियां बाबा गेलां, वगैरे. ट्रंपमध्ये सानुनासिक उच्चार असेल तर तो शब्द हिंदीत ट्रँप असा लिहावा लागेल. (उदा० हिंदी शब्द हँसी, जाँच, कँवलजित, कँपकँपाहट, वगैरे). ट्र्रंप हा शब्द मराठीत ट्रम्प असाच खणखणीत उच्चारला जातो, सानुनासिक नाही! यास्तव, 'ट्रम्प' लिहिण्याची गरज नाही. . ... (चर्चा) १३:२४, ३ एप्रिल २०१९ (IST)