Jump to content

चर्चा:जॉन रॉबर्ट्‌स

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे नावात 'रॉबर्टस्' असे हवे काय? कृपया खुलासा करावा.

वि. नरसीकर (चर्चा) ११:२८, २२ जून २०१० (UTC)

रॉबर्ट्स हा शब्द रॉब +र्+ट्+स असा लिहिला गेला आहे. माझ्या मते हेच बरोबर शुद्धलेखन आहे. Ideally, ट् च्यावर रेफ आली असता व्यवस्थित दिसले असते, पण न्याहाळकाची क्षती आहे, शुद्धलेखनाची नव्हे.
अभय नातू १६:५४, २२ जून २०१० (UTC)

हाच शब्द रॉब +र्+ट+स् असा लिहिण्यास काय हरकत आहे. नविन माणसास तो एकदम चुक वाटेल.न्याहाळकाची क्षती वगैरे नविन माणुस विचार करणार नाही.त्यासाठी आपणच जुळवुन घ्यावयास हवे असे माझे मत आहे.शेवटी अंतीम निर्णय आपलाच आहे.मला योग्य वाटले ते मी मांडले.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:१७, २३ जून २०१० (UTC)

नरसीकर,
न्याहाळकाच्या क्षतीखातर आपले शुद्धलेखन बदलू नये असे वाटते. काही दिवसांत (अशी आशा!!) गूगल, मायक्रोसॉफ्ट, मोझिला येथील सुज्ञ मंडळी त्यांची चूक सुधारतील तेव्हा +र्+ट्+स हे व्यवस्थित दिसायला लागेल.
तुम्ही विकिपीडियाच्या व वाचकांच्या हितासाठी मते मांडता याबद्दल मला शंका नाहीच नाही.
अभय नातू १७:४३, २३ जून २०१० (UTC)

हरकत आहे

[संपादन]

>>हाच शब्द रॉब +र्+ट+स् असा लिहिण्यास काय हरकत आहे. <<

हरकत आहे! देवनागरीमधील ‌’ ् ’ या चिन्हाला मराठी सोडून अन्य भारतीय भाषांत ’विराम चिह्न’ म्हणतात. मराठीत तो शब्द वेगळ्या अर्थाने वापरात असल्याने आपण त्या चिन्हाला ’पाय मोडायचे चिन्ह’, ’व्यंजनाखालचा फाटा’ किंवा ’हलन्त चिन्ह’ म्हणतो. परंतु विराम चिह्न हाच अधिकृत शब्द आहे.

अर्थ स्पष्ट आहे. जेव्हा जेव्हा हे चिन्ह दिसेल, तेव्हा तेव्हा क्षणभर ’विराम’ (पॉज, यती) घेऊन पुढचे अक्षर उच्चारावे. ’र्‌ट्‌स्‌’चा उच्चार र्‌ + (पॉज) + ट्‌ + (पॉज) + स्‌ असा होईल. बालोद्यानचा उच्चार बालो+द्यान आणि बालोद्‌यानचा बालोद्‌ + (पॉज) + यान असा होतो. त्यामुळे बालोद्‌यान लिहिणे सर्वथा निषिद्ध!

तथाकथित ’ ् ’ या विरामचिह्मचा वापर जेव्हा करायचा असेल तेव्हा तो, त्या चिन्हाचा वर सांगितलेला अर्थ विचारात घेऊनच करावा.

उद्‌घाटन या शब्दाचे उच्चारण उद्‌ + (पॉज) + घाटन्‌ असे असल्याने, हा शब्द उच्चारताना द्‌ नंतर पॉज घेणे अभिप्रेत आहे; त्यामुळे येथे विराम चिन्हाचा केलेला वापर अनुचित नाही,. म्हणून हा शब्द उद्घाटन असा लिहिला नाही तरी चालते. मात्र कोणत्याही परिस्थितीत या शब्दाचा उच्चार उद्घा + (पॉज) + टन्‌ असा करू नये,

स्पोर्ट्‌स, लॉर्ड्‌ज, हे शब्द टंकताना रफारयुक्त पायमोडका ट किंवा ड लिहायला काय अडचण आहे? मुद्दाम स्पोर्ट्स, किंवा लॉर्ड्ज असे अशुद्ध लेखन का करावे?. द्वंद्व हा शब्द द्‌वंद्‌व असा का लिहितात, आणि Twitter हा ट्विटर असा? हे थांबायला हवे.

आणखी एक. ’रॉबर्टस्‌चे स्पेलिंग Rŏ ber tuss' असे होईल. त्यामुळे तो शब्द तसा लिहिता येणार नाही. ... (चर्चा) १३:४४, १७ जून २०१५ (IST)[reply]